सराफा दुकानदाराची नजर चुकवून पायातील चैनचे ७ नग लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:15 IST2020-12-09T04:15:16+5:302020-12-09T04:15:16+5:30

लातूर: गंजगोलाई परिसरातील सराफा दुकानात आलेल्या चार अज्ञात महिलांनी दुकानदाराची नजर चुकवून पायातील चैनचे सात नग लंपास केले. ही ...

7 lamps with chain straps without losing sight of the bullion shopkeeper | सराफा दुकानदाराची नजर चुकवून पायातील चैनचे ७ नग लंपास

सराफा दुकानदाराची नजर चुकवून पायातील चैनचे ७ नग लंपास

लातूर: गंजगोलाई परिसरातील सराफा दुकानात आलेल्या चार अज्ञात महिलांनी दुकानदाराची नजर चुकवून पायातील चैनचे सात नग लंपास केले. ही घटना सहा डिसेंबर रोजी घडली. याबाबत सराफा दुकानदाराने दिलेल्या फिर्यादीवरून गांधी चौक पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चार महिलांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

गंजगोलाई परिसरात राजेंद्र बोकन यांचे सोन्या-चांदीचे दुकान आहे. या दुकानात सहा डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास चार अज्ञात महिला आल्या. त्यांनी चांदीचे चैन घेण्यासाठी विचारणा केली. दरम्यान दुकानदार फिर्यादी बोकन यांची नजर चुकवून या महिलांनी चैनचे ७ नग लंपास केले. ६५६ ग्रॅम चांदीचे चैन या महिलांनी चोरले असे, राजेंद्र बोकन यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार गांधी चौक पोलीस ठाण्यात कलम ३८०,३४ भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. जाधव करीत आहेत.

Web Title: 7 lamps with chain straps without losing sight of the bullion shopkeeper