शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी पंपांची ५८०० कोटींची थकबाकी; वसूलीसाठी महावितरण ॲक्शन मोडवर !

By संदीप शिंदे | Updated: November 19, 2022 19:30 IST

लातूर परिमंडल : ११ हजार ६६६ कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडीत

लातूर : महावितरणच्यालातूर परिमंडळातील बीड, उस्मानाबाद आणि लातूर या तीन जिल्ह्यातील ४ लाख ६४ हजार ४९२ शेतकऱ्यांकडे ५ हजार ८७९ कोटी ३७ लाखांची थकबाकी आहे. त्यामुळे महावितरण वसूलीसाठी ॲक्शन मोडवर आला असून, थकबाकी न भरल्यास वीजपुरवठा खंडीत करण्यात येत आहे.यंदा समाधानकारक पाऊस झालेला असल्याने सिंचनासाठी पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे रबी हंगामासाठी विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार असून, वीजेची खरेदी, रोहित्रांची दुरुस्ती, ऑईल खरेदीसह आवश्यक दुरुस्तींसाठी थकीत विजबिलाची वसूली होणे आवश्यक आहे. १६ नोव्हेंबरच्या आकडेवारीनुसार बीड जिल्ह्यात १ लाख ७९ हजार ३३० कृषिपंपधारकांकडे २२८८ कोटी ८८ लाख, लातूर १ लाख ३१ हजार ६७२ पंपधारकांकडे १७८३ कोटी ७४ लाख तर उस्मानाबाद जिल्ह्यातील १ लाख ५३ हजार ४९० कृषी ग्राहकांकडे १ हजार ८०६ कोटी ७५ लाखांची थकबाकी आहे.

तीनपैकी एक बिल भरणे आवश्यक...महावितरणच्या वतीने कृषीपंपांना वर्षातून तीन बिले दिली जातात. यामध्ये एकही बिल न भरल्याने थकबाकी वाढली आहे. त्यामुळे महावितरणतर्फे थकीत बिलाच्या वसूलीसाठी मोहीम राबविली जात आहे. ज्या कृशि पंपधारकांकडे थकबाकी आहे. त्यांनी भरणा करुन महावितरणला सहकार्य करावे. - सुंदर लटपटे, मुख्य अभियंता

जिल्हा ग्राहक संख्या थकबाकी (कोटीत)बीड            १७९३३० २२.८८.८८लातूर            १३१६७२ १७८३.७४उस्मानाबाद १५३४९० १८०६.७५एकूण            ४६४४९२ ५८७९.३७

टॅग्स :laturलातूरmahavitaranमहावितरणAgriculture Sectorशेती क्षेत्र