जिल्ह्याला ५५० रेमडेसिविर उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:19 AM2021-05-10T04:19:40+5:302021-05-10T04:19:40+5:30

सरकारी दवाखान्यात खिचडीचे वाटप लातूर : समाजसेवा सामाजिक संस्थेच्या वतीने सरकारी रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाइकांना खिचडीचे वाटप करण्यात आले. संस्थेचे ...

550 Remedivir available to the district | जिल्ह्याला ५५० रेमडेसिविर उपलब्ध

जिल्ह्याला ५५० रेमडेसिविर उपलब्ध

Next

सरकारी दवाखान्यात खिचडीचे वाटप

लातूर : समाजसेवा सामाजिक संस्थेच्या वतीने सरकारी रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाइकांना खिचडीचे वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष अमोल शिंदे, शुभम मिटकरी, सचिव शैलेश चव्हाण, सहसचिव शिरीष क्षीरसागर, सागर सोनवट, अजय गायकवाड, संविधान गायकवाड, आदींची उपस्थिती होती.

मनसेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर

लातूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, बेड, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड यांसाठी लागणारा निधी शासकीय कर्मचारी तसेच आमदार, नगरसेवक यांच्या पगारातून कपात करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, लातूर शहरच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर मनसे शहराध्यक्ष मनोज अभंगे यांची स्वाक्षरी आहे.

शासकीय कार्यालयात नियमांचे पालन

लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लातूर शहरातील शासकीय कार्यालयात नियमांचे पालन करण्यात येत आहे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार उपस्थिती आहे. कामासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची पल्स ऑक्सिमीटर तसेच थर्मल गनद्वारे तपासणी केली जात आहे. मास्क, फिजिकल डिस्टन्स आणि सॅनिटायझर वापराबाबत वेळोवेळी सूचना केल्या जात आहेत. जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, प्रशासकीय इमारत, आदी कार्यालयांत योग्य खबरदारी घेतली जात आहे.

Web Title: 550 Remedivir available to the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.