शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

पोलीस भरतीचे स्वप्न राहिले अपूरे; रस्त्यावर व्यायाम करताना कारने चिरडले; तरुणाचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 11:17 AM

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका तरुणाचा कारच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अहमदपूर-अंबाजोगाई मार्गावरील दगडवाडी येथे घडली आहे.

किनगाव (लातूर) : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका तरुणाचा कारच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अहमदपूर-अंबाजोगाई मार्गावरील दगडवाडी येथे घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अहमदपूर तालुक्यातील दगडवाडी येथील दोन युवक नेहमीप्रमाणे पोलीस भरतीसाठी  रस्त्याच्या बसून व्यायाम करत होते. यावळी अचानक भरधाव वेगातील कारची त्यांना धडक बसली. यात  एकजण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्दैवी घटना रविवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास दगडवाडी येथे घडली आहे. दगडवाडी येथील रहिवासी असलेला मयत मुकुंद रामराव मुंढे (22) व प्रतिक पांडुरंग मुंढे (22) हे दोघे वर्गमित्र असून ते पोलीस भरतीसाठी दररोज पहाटे उठून व्यायाम  करीत असत. मुकुंद मुंढे हा डी फार्मसीचे शिक्षण झाल्याने एका मेडिकल दुकानावर काम करीत होता. तर, प्रतिक मुंढे याची आसाम रायफल्समध्ये भरती झाली आहे.  

रविवारी सकाळी हे दोघे रस्त्याच्या बाजूस व्यायाम करीत असताना अंबाजोगाईकडून अहमदपूरकडे जाणाऱ्या भरधाव वेगातील कार (एमएच 44, एस 7970) ने त्या दोघांना धडक दिली. यात मुकुंद मुंढे याचा जागीच मृत्यू झाला. प्रतिक मुंढे हा गंभीर जखमी झाल्याने त्याला अंबाजोगाई येथील सरकारी रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलीस खात्यात भरती होऊन गावाचे नाव उंचावण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका तरुण पोराचा एका दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.

टॅग्स :laturलातूरAmbajogaiअंबाजोगाईAccidentअपघातDeathमृत्यू