केशवराज विद्यालयाच्या २४ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:15 AM2021-07-18T04:15:27+5:302021-07-18T04:15:27+5:30

केशवराज विद्यालयातून ६६९ विद्यार्थी दहावी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी २४ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण प्राप्त केले. तर १७१ ...

100 percent marks for 24 students of Keshavraj Vidyalaya | केशवराज विद्यालयाच्या २४ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण

केशवराज विद्यालयाच्या २४ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण

googlenewsNext

केशवराज विद्यालयातून ६६९ विद्यार्थी दहावी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी २४ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण प्राप्त केले. तर १७१ विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा अधिक गुण घेतले आहेत. विशेष प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांची संख्या ४२१, प्रथम श्रेणी प्राप्त विद्यार्थी १८४, द्वितीय श्रेणी प्राप्त ६२ विद्यार्थी, तृतीय श्रेणी प्राप्त करणारे ०२ विद्यार्थी आहेत. शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचे भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र आलुरकर, कार्यवाह नितीनराव शेटे, प्रा.चंद्रकांत मुळे, हेमंत वैद्य, कल्पनाताई चौसाळकर, किरणराव भावठाणकर, संयोजक प्रकाश जोशी, समन्वय समिती अध्यक्ष यशवंतराव देशपांडे, कार्यवाह जितेश चापसी, शालेय समिती अध्यक्ष आनंदराज देशपांडे, मुख्याध्यापक संजय विभुते, उपमुख्याध्यापक महेश कस्तुरे, पर्यवेक्षक संजय कुलकर्णी, संदीप देशमुख, दिलीप चव्हाण, रेणुका गिरी, रमेश चव्हाण आदींसह शिक्षक, कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.

Web Title: 100 percent marks for 24 students of Keshavraj Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.