व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान तांत्रिक अडचणींनी संपूर्ण नोंदणी प्रक्रिया रद्द करण्यात आली आणि २४ जूनपासून पुन्हा नव्याने प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय सीईटी सेल आणि प्रवेश प्राधिकरणाकडून घेण्यात आला. ...
अकरावी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर होऊन आत बायफोकल प्रवेशाची यादी जाहीर व्हायची वेळ आली, तरी अकरावीच्या एकूण जागा किती याची माहिती उपसंचालक विभागाकडून जाहीर करण्यात आली नाही. ...
राज्य मंत्रिमंडळ विस्तार प्रकरणी नवनिर्वाचित मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, अविनाश महातेकर आणि जयदत्त क्षीरसागर यांना सोमवारी उच्च न्यायालयाने नोटीस बजावत चार आठवड्यांत नियुक्तीविरोधात दाखल याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश दिले. ...
जेट एअरवेजच्या दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू झाल्याने, जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन, इतर भत्ते मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. जेट एअरवेजच्या दिवाळखोरीमुळे जेटचे कर्मचारी देशोधडीला लागले आहेत. ...
दुष्काळाची पार्श्वभूमी असताना राज्यात उशिराने दाखल झालेला मान्सून अद्याप सक्रीयही न झाल्याने राज्यभरातील धरणे कोरडीठाक पडली आहेत. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार, सोमवारी राज्यातील धरणांत एकूण केवळ ६ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक होता. ...