‘ईव्हीएममुळे देशाच्या अस्तित्वाला धोका’ - उदयनराजे भोसले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 05:52 AM2019-06-25T05:52:21+5:302019-06-25T05:52:41+5:30

भारत हा लोकशाही असलेला देश आहे. निवडणुकीत मतदान करून लोक सरकार निवडतात परंतु जर ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करून जर कोणी निवडून येत आहेत.

'The threat of existence of the country due to EVMs' - Udayan Raje Bhosale | ‘ईव्हीएममुळे देशाच्या अस्तित्वाला धोका’ - उदयनराजे भोसले

‘ईव्हीएममुळे देशाच्या अस्तित्वाला धोका’ - उदयनराजे भोसले

googlenewsNext

मुंबई  - भारत हा लोकशाही असलेला देश आहे. निवडणुकीत मतदान करून लोक सरकार निवडतात परंतु जर ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करून जर कोणी निवडून येत आहेत. या ईव्हीएममुळे देशाच्या अस्तित्वाला धोका आहे, असे मत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

सातारा लोकसभा मतदार संघातून उदयनराजे भोसले १ लाख २६ हजार मतांनी निवडून आले. परंतु आपल्यालायापेक्षा जास्त मते मिळाली असतील असा त्यांचा दावा आहे. तसेच या मतदार संघातील निकालात वाई विधानसभा अधिक ३४४,कोरेगाव विधानसभेत अधिक पाच उत्तर कराड मध्ये अधिक १४८ ,दक्षिण कराड अधिक पाच ,पाटण विधानसभेत अधिक ९७,सातारा विधान कमी ७५ मतांची तफावत आहे. असे त्यांनी सांगितले.ऑ

ईव्हीएमबाबत बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले की, आज ईव्हीएमच्या समर्थनार्थ अनेक विचारवंत बोलत आहेत. त्याबाबत केवळ इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरनीच बोलले पाहिजे. तसेच निवडूणुक आयोगही ईव्हीएम हॅक करू शकत नसल्याचा दावा करत आहे. कॉम्प्युटरसारखे मशीन जर हॅक होऊ शकत असेल तर ईव्हीएमही हॅक होऊ शकते. त्यामुळे ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरचा वापर करायला हवा, असे ते म्हणाले. विकसित देश एव्हीएम सोडून बॅलेट पेपर वापरत आहेत.बॅलेट पेपर हे आर्थिकदृष्ट्या परवडणारे आहे. एव्हीएमला ३३,००० रूपये खर्च येतो तर बॅलेट पेपर बॉक्सला ३३० रुपये खर्च येतो. त्यामुळे पैशांची बचत होईल. सातारा लोकसभेची पोटनिवडणूक घेतल्यास बॅलेट पेपर बॉक्सचा खर्च करण्याची तयारी आहे, असे त्यानी सांगितले.

राजीनामा देण्याची तयारी
सातारा लोकसभा मतदार संघात झालेले मतदान आणि निकालाची आकडेवारी यात तफावत असून येथे पोटनिवडणूक घेऊन बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे. त्यासाठी राजीनामा देण्यास तयार आहे असे खा. उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

Web Title: 'The threat of existence of the country due to EVMs' - Udayan Raje Bhosale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.