एखाद्याचे पाचपैकी एक ज्ञानेंद्रिय निसर्ग हिरावून घेतो तेव्हा अन्य ज्ञानेंद्रिये इतरांहून अधिक तीक्ष्ण होतात, हे जगन्मान्य सत्य आहे. म्हणूनच अशा व्यक्तींना अपंग न म्हणता ‘डिफरंटली एबल्ड’ म्हणणे योग्य ठरते. ...
सत्तेच्या सारीपाटात लोकशाही जनमताची घोर प्रतारणा. चलाख राजकारण्यांनी पक्षांतरबंदी कायदा निरर्थक बनवून टाकला आहे. विधिमंडळ पक्षातील दोन तृतीयांशाहून कमी आमदारांनी पक्ष सोडला तर हा कायदा लागू होतो व त्यांची आमदारकी रद्द होते. इथे २२ आमदारांनी स्वत:हून ...
उच्चभ्रू महिलांवरील अत्याचाराची चर्चा होते, महिला रस्त्यावर उतरतात, मोर्चे काढतात, बलात्काऱ्यांना फाशी देण्याची मागणी करतात. हे सारे स्वाभाविक नि रास्त आहे; पण त्याच वेळी दलित महिला-मुलींवर अत्याचार झाले तर समाज मूक राहतो. ...
संख्याबळ पाहता सत्ताधारी भाजप राज्यसभेच्या चारपैकी दोना जागा स्वबळावर सहज जिंंकू शकते. त्याहून जास्त जागांसाठी त्यांना इतरांची मदत लागेल किंवा विरोधकांची मते कमी व्हावी लागतील. ...
रविवारी मुंबईत फेडरेशन आॅफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज, इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन, इंडियन फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ...
मध्य प्रदेश विधानसभेचे अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. प्रथेनुसार अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होईल. त्यानंतर लगेच सरकारने बहुमत सिद्ध करावे असे अधिकृत पत्र राज्यपाल लालजी टंडन यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले. ...
साथरोग नियंत्रण कायदा लागू झाला, म्हणजे राज्यात साथीच्या आजाराचा उद्रेक झाला, असा समज नागरिकांनी करून घेऊ नये. याउलट हा आजार रोखण्यासाठी या कायद्याच्या माध्यमातून अधिक प्रभावी उपाय योजण्यास मदतच होणार आहे ...