ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा एप्रिल २०२० पासूनचा कॉल डाटा रेकॉर्ड (सीडीआर) आणि सबक्राइबर डिटेल रेकॉर्ड (एसडीआर) जतन करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने पोलिसांना मंगळवारी दिले. ...
चित्रपटातील पोलीस आणि प्रत्यक्षातील पोलीस यांच्यात फरक असतो. प्रसंगावधानता हा अत्यंत महत्त्वाचा गुण पोलिसांच्या अंगी आवश्यक असतो, कधी एखादी कारवाई केली, तर का केली आणि कारवाई नाही केली, तर का केली नाही, याबद्दलही प्रश्न उपस्थित केले जातात. ...
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वन आणि व्याघ्र प्रकल्पाच्या कुठल्याही विश्रामगृह किंवा संकुलात मांसाहारी जेवणावर पूर्णत: बंदी आहे. तो एक मोठा गुन्हा असताना, निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याचा हट्ट हा मटणाचे जेवण व दारू यासाठीच असायचा. ...
राज्यातील १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या ५०० हून अधिक डॉक्टरांचा वैद्यकीय शिक्षण विभागाच्या तुघलकी कारभारामुळे मागील तीन महिन्यांपासून पगारच झाला नसल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. ...
Coronavirus in Maharashtra : मास्क न घालता फिरणारी एक कोरोनाबाधित व्यक्ती ४०० लोकांना कोरोनाची लागण करू शकते, अशी भीती राज्य सरकारने नेमलेल्या टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. ...
जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत असून, घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना अवघ्या २९ दिवसांच्या कोरोनाग्रस्त बाळाचा आणि ६ महिन्यांच्या मुलीचा २९ मार्च रोजी मृत्यू झाला. ...
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) वेबसाईट हॅक करीत खंडणीची मागणी करण्यात आल्याने खळबळ उडाली. मात्र, या धमकीला दाद न देता एमआयडीसीच्या तंत्रज्ञांनी पूर्ण डाटा मिळवत संपूर्ण संगणक यंत्रणा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. ...
काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराच चव्हाण यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक पत्रच शेअर केलं आहे. त्यामध्ये, लॉकडाऊन करणार असाल, तर अगोदर लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करा, असा इशारावजा सल्लाच चव्हाण यांनी सरकारला दिलाय. ...