बाबो! २ वर्षांपासून माहेरी जाऊन बसली पत्नी, पतीचा ५० फूट उंच झाडावर चढून हाय व्होल्टेज ड्रामा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 09:42 AM2021-03-31T09:42:36+5:302021-03-31T09:47:33+5:30

या घटनेची माहिती प्रशासनाला देताच त्यांनी तरूणाला खाली उतरवण्यासाठी क्रेन आणली. त्यानंतर खाली गाद्या टाकण्यात आल्या.

Husband wife fighting high voltage drama husband climbed 50 feet tall peepal tree | बाबो! २ वर्षांपासून माहेरी जाऊन बसली पत्नी, पतीचा ५० फूट उंच झाडावर चढून हाय व्होल्टेज ड्रामा!

बाबो! २ वर्षांपासून माहेरी जाऊन बसली पत्नी, पतीचा ५० फूट उंच झाडावर चढून हाय व्होल्टेज ड्रामा!

googlenewsNext

राजस्थानच्या धौलपूरमधून एक अजब घटना समोर आली आहे. येथील एका तरूणाने परिसरात मंगळवारी हाय व्होल्टेज ड्रामा केला. हा तरूण ५० फूट उंच पिंपळाच्या झाडावर चढला. त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. इतकेच नाही तर या तरूणाने झाडावर चढल्यावर स्वत:चे पाय दोरीने बांधून घेतले होते. स्थानिक लोकांनी प्रशासनाला याबाबत माहिती दिली तेव्हा मोठ्या प्रयत्नांनंतर त्याला खाली उतरवण्यात आलं.

या घटनेची माहिती प्रशासनाला देताच त्यांनी तरूणाला खाली उतरवण्यासाठी क्रेन आणली. त्यानंतर खाली गाद्या टाकण्यात आल्या. तरूणाला खूप समजावून सांगितल्यावर त्याला खाली सुरक्षित उतरवण्यात आलं. त्याला खाली उतरवताच प्रशासनाने सुटकेचा निश्वास घेतला. 

पोलीस या तरूणाला सोबत घेऊन गेले आणि त्याची चौकशी केली गेली. मिळालेल्या माहितीनुसार, या तरूणाने हा सर्व ड्रामा केला कारण त्याची पत्नी माहेरी गेली आहे आणि परत सासरी येत नाहीये. यात तरूणाची कुणी मदतही करत नाहीये.

मीडिया रिपोर्टनुसार, तरूणाने हा हाय व्होल्टेज ड्रामा आपल्या माहेरी गेलेल्या पत्नीवर नाराज होऊन केला. कारण त्याची पत्नी परतच येत नाहीये आणि यात कुणी त्याची मदतही करत नाहीये. या तरूणाचं नाव लहोरेराम भदौरिया आहे. त्याची पत्नी गेल्या दोन वर्षापासून आपल्या माहेरी गेली आहे. 

या तरूणाने सांगितले की, माहेरचे लोक त्याच्या पत्नीला खोटं काही सांगून घेऊन गेले आणि आता ते तिला परत येऊ देत नाहीयेत. त्याने अनेकदा पोलिसातही याबाबत सांगितले. पण त्याची मदत कुणी केली नाही. त्यामुळे हैराण होऊन अखेर तो पिंपळाच्या झाडावर चढला. जेणेकरून त्याची पत्नी परत येईल.

पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. त्याची पत्नी सासरी परत का येत नाहीये याचाही तपास घेतला जात आहे. सध्या तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 
 

Web Title: Husband wife fighting high voltage drama husband climbed 50 feet tall peepal tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.