शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
3
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या योजना कृषी विभागाकडून ‘हायजॅक

By admin | Updated: November 21, 2014 00:28 IST

राज्य शासनाचा दुजाभाव : जिल्हा परिषदेचा कृषी विभाग बनतोय दुबळा आणि बिनकामाचा

आयुब मुल्ला - खोची -जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडील नऊपैकी सहा योजना शासनाच्या कृषी विभागाने आपल्याकडे घेऊन योजनांची पूर्तता आम्हीच करून दाखवू शकतो, असे निर्देश दिले आहेत; परंतु त्याचे परिणाम मात्र जिल्हा परिषद सदस्यांच्या कामांवर होणार आहेत. शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ त्यांच्याकरवी देता येणार नसल्याने हा विभाग त्यांच्यादृष्टीने बिनकामाचा बनला आहे.विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या बहुतांश उपाध्यक्षांकडे कृषी सभापतिपद असल्याने हे सुद्धा नामधारी बनले आहेत. शासनाच्या विभागाने मात्र नामी शक्कल लढवित एकापाठोपाठ एक योजना हायजॅक करीत आपले महत्त्व वाढवून घेतले आहे. बहुतांश योजना या केंद्रपुरस्कृत आहेत. जिल्हा परिषद या योजनांसह राज्यशासनाच्या दोन योजनांचा लाभ देण्याचे काम करीत होती. आता मात्र राज्य शासनाची फलोत्पादन पीक संरक्षण, अनुसूचित जाती उपाययोजना व ग्रामविकास मंत्रालयाची राष्ट्रीय बायोगॅस योजना एवढ्यांचीच अंमलबजावणी करण्याचा अधिकार कृषी विभागाकडे राहिला आहे.सभापतिपद निर्माण करावयाचे व त्यासाठी कामाचा विस्तृत अवाकाच नसेल तर ते पद काय उपयोगाचे अशा भावना निर्माण होत आहेत. ग्रामीण विकासाचे जिल्हा पातळीवरील प्रमुख केंद्र असलेल्या या ठिकाणी सदस्य म्हणून काम करणारेही आता चांगलेच कोड्यात पडले आहेत. शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांचा लाभ त्यांना मिळवू देता येत नसल्याने तेही निराश झाले आहेत. अनुदानावर आधारित योजनांचा लाभ देण्यासाठी त्यांची शिफारसही आता इतिहासजमा होणार आहे. वास्तविक, पंचायत राजसंस्था बळकटी करण्यासाठी ७३ व्या घटना दुरुस्तीनुसार शासनाच्या योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात प्रभावीपणा यावा हा हेतू होता. तसे सुरूवातीला प्रयत्न झाले. कृषी विभागाची यांत्रिकीकरणाची योजना तर शेतीला आधुनिक स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी उत्तम पद्धतीने राबविण्यात आली. परंतु, अशा अनेक महत्त्वपूर्ण योजना राबविण्याचा अधिकार असतानासुद्धा त्या शासनाच्या कृषी विभागाकडे वर्ग केल्या जात आहेत. त्यामुळे या विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचीही संख्या कमी करून त्यांना इतर विभागात रुजू करून घेतले आहे.जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य हे शेतकऱ्यांचेच नेतृत्व करतात. त्यांचा त्यांच्याशी सततचा संपर्क असतो. त्यामुळे हक्काने लाभ मिळावा यासाठी ते काम सांगतात; परंतु योजनाच वर्ग झाल्याने सदस्यांची कुचंबणा झाली आहे. शेतकऱ्यांना काय उत्तर द्यायचे अशा संभ्रमात ते आहेत. कृषी विभागाकडे अगोदरच कामे प्रलंबित पडत असताना पुन्हा त्यांच्याकडेच योजना हस्तांतरित करण्याचा प्रकार योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.ं‘खो’ देण्याचेच कामठिबक व तुषार सिंचन, कडधान्य विकास कार्यक्रम, तृणधान्य विकास कार्यक्रम, मका विकास कार्यक्रम, ऊस विकास कार्यक्रम, कृषी यांत्रिकीकरण या टप्प्याटप्प्याने जिल्हा परिषदेकडून आपल्याकडे येऊन योजनाच हायजॅक करण्याचा सपाटा लावला. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने शासनाकडे सतत पाठपुरावा करून पुन्हा योजना हस्तांतरित होण्यासाठी प्रयत्न केले; पण त्यास ‘खो’ देण्याचेच काम झाले आहे.