शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

‘रिपाइं’चा जिल्हा परिषदेत ठिय्या

By admin | Updated: September 3, 2015 23:56 IST

मधाळे यांचे सेवानिवृत्तीचे लाभ प्रकरण : शिक्षणाधिकारी कक्षासमोर आंदोलन; कामकाज विस्कळीत

कोल्हापूर : येथे जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या कक्षासमोर रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी गुरुवारी ठिय्या आंदोलन केले. आर्य समाज शिक्षण संस्थेच्या शाहू दयानंद व बा. कृ. पाटील संस्थेकडून जयवंत मधाळे यांना सेवानिवृत्तीनंतरचे लाभ मिळू नयेत म्हणून त्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप करीत त्यांनी आंदोलन केले. यावेळी शिक्षण संस्था आणि शिक्षण प्रशासन यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, शिक्षणाधिकारी जोत्स्ना शिंदे यांनी मधाळे यांचे सेवापुस्तक पोलीस बंदोबस्तात संस्थेकडून ताब्यात घेतले जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर सुमारे दीड तास चाललेले आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी शिष्टमंडळातर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, शाहू दयानंद शिक्षण संस्था व शासकीय अधिकारी यांनी जाणीवपूर्वक जयवंत मधाळे यांना निवृत्तीनंतर पेन्शन व अन्य लाभ मिळू नयेत, असे प्रयत्न केले आहेत. सूडबुद्धीने, जातीय द्वेषातून ते त्रास देत आहेत. मधाळे यांनी यापूर्वीही संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला आहे. मात्र, त्यांना न्याय मिळाला नाही. २९ मार्च २०१४ मध्ये शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर त्यांनी आत्मदहनाचाही प्रयत्न केला होता. मध्यंतरी सहा महिन्यांसाठी पेन्शन मंजूर झाली. त्यानंतर अनेकवेळा पाठपुरावा करूनही मुख्याध्यापक, संस्थाचालक, संबंधित लिपिक यांनी मधाळे यांचे निवृत्तिवेतनाची कागदपत्रे दिली नाहीत. ते टाळाटाळ करीत असून, पेन्शन न मिळाल्याने मधाळे यांच्या कुटुंबाची आर्थिक फरफट होत आहे.गुरुवारी दुपारी बारा वाजता रिपब्लिकनचे कार्यकर्ते, पदाधिकारी जिल्हा परिषदेत घुसले. त्यांनी शिक्षणाधिकारी यांच्या कक्षासमोरच ठिय्या मारल्याने गोंधळ उडाला. यानंतर घोषणाबाजी, निदर्शने केल्यामुळे दीड तास शिक्षण विभागाचे कामकाज ठप्प झाले. कक्षाच्या प्रवेशद्वारातच ठिय्या मारलेल्या आंदोलकांनी वारंवार आत-बाहेर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून त्यांना मज्जाव केला. परिणामी, काही काळ तणाव निर्माण झाला. शिक्षणाधिकारी शिंदे यांच्याकडून सेवापुस्तक ताब्यात घेण्याची ग्वाही दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले.आंदोलनात रिपब्लिकनचे विलास भामटेकर, सुखदेव बुध्याळकर, एस. डी. कांबळे, बी. डी. पाटील, राम पाटील, रूपा वायदंडे, संजय जिरगे, राहुल कांबळे, प्रताप बाबर, आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)फौजदारी गुन्हा दाखल करा...मधाळे यांची आर्थिक कोंडी झाली आहे. मानसिक ताण वाढल्याने त्यांची प्रकृती गंभीर बनल्यामुळे ३१ आॅगस्टला त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांच्या जीवितास धोका झाल्यास संस्थाचालक अ‍ॅड. दिलीप पाटील, मुख्याध्यापक, लिपिक राजेंद्र कांबळे, शिक्षणाधिकारी जोत्स्ना शिंदे, उपसंचालक मकरंद गोंधळी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांना जबाबदार धरून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही निवेदनाद्वारे केली आहे.शिक्षण प्रशासनाने वेळोवेळी मधाळे यांना मदत केली आहे. संस्थाचालकांकडून कागदपत्रे मिळण्यात अडचणी आहेत. यासंबंधी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे सुनावणी झाली आहे. मी स्वत: लक्ष घालून मधाळे यांच्या प्रकरणाचा वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा केला आहे. तरीही माझ्या कक्षासमोर आंदोलन करणे कितपत योग्य आहे?- जोत्स्ना शिंदे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)