अरुण भोसलेंपासून युवकांनी प्रेरणा घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:45 IST2021-02-21T04:45:41+5:302021-02-21T04:45:41+5:30

कुंभोज : परिश्रमाच्या जोरावर खात्यांतर्गत परीक्षा ...

Youth should take inspiration from Arun Bhosale | अरुण भोसलेंपासून युवकांनी प्रेरणा घ्यावी

अरुण भोसलेंपासून युवकांनी प्रेरणा घ्यावी

कुंभोज : परिश्रमाच्या जोरावर खात्यांतर्गत परीक्षा देऊन कर्तृत्व सिद्ध करणारे अरुण भोसलेे यांच्या निवडीपासून युुुुवकांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य दलितमित्र अशोकराव माने यांनी केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या खात्यांतर्गत स्पर्धा परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याने कुंभोज येथील अरुण वसंत भोसले यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते.

दरम्यान, पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल अरुण भोसले यांचा जि. प. सदस्य अशोकराव माने यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी सरपंच माधुरी घोदे, उपसरपंच दाविद घाटगे, वारणा दूध संघाचे नूतन संचालक अरुण पाटील, जवाहर साखर कारखान्याचे संचालक बाबासाहेब चौगुले, युवा नेते किरण माळी, शरद साखर कारखान्याचे संचालक आप्पासाहेब चौगुले, प्रकाश पाटील, श्रीकांत माळी, प्राचार्य सागर माने, भरत भोकरे, विनायक पोतदार, नूतन ग्रा. पं. सदस्य, जालिंदर कोळी, प्रमोद आरगे, प्रवीण पाचोरे, अभिजित काटकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन कलगोंडा पाटील, तर राजू कुंडले यांनी आभार मानले.

फोटो ओळी- कुंभोज, ता. हातकणंगले येथील अरुण भोसले यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्यानिमित्त सत्कार करताना जि. प. सदस्य अशोकराव माने, सरपंच माधुरी घोदे, अरुण पाटील, बाबासाहेब चौगुले, किरण माळी, आदी.

Web Title: Youth should take inspiration from Arun Bhosale