Kolhapur: किरकोळ वाद झाला; मित्र म्हणाले, आमच्या गाडीतून येऊ नकोस चालत ये, अन्..
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 17:52 IST2025-11-05T17:51:27+5:302025-11-05T17:52:22+5:30
पत्नीला फोन करून मी चालत येत आहे, असे सांगितले

Kolhapur: किरकोळ वाद झाला; मित्र म्हणाले, आमच्या गाडीतून येऊ नकोस चालत ये, अन्..
शिरोली: टोप (ता. हातकणंगले) येथे ट्रॅक्टर-ट्रॉली अंगावरून गेल्याने अनंत नामदेव दरेकर (वय ४०,रा. विलासनगर शिरोली) हे जागीच ठार झाले. हा अपघात टोप बाजार कट्टासमोर महामार्गावर सायंकाळी सहाच्या सुमारास घडला.
घटनास्थळावरून मिळालेले अधिक माहिती अशी आनंद दरेकर हे मित्रांसोबत मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास पेठवडगाव येथे चारचाकी गाडी पाहण्यासाठी गेले होते. गाडी पाहून झाल्यानंतर मित्रांच्यात किरकोळ वाद झाला आणि तो चालत ये आमच्या गाडीतून येऊ नकोस, असे मित्रांनी सांगितले.
त्यानंतर दरेकर हा वडगाव येथून शिरोलीच्या दिशेने चालत येत होता. यावेळी त्याने पत्नीला फोन करून मी चालत येत आहे, असे सांगितले पत्नीने चालत येऊ नका गाडी लावून देते, असा निरोप दिला आणि पण दरेकर यांनी पायी प्रवास सुरू केला होता. तो टोप येथे महामार्गालगत असलेल्या सेवामार्गावरुन चालत येत असताना वाठारहून कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या ट्रॅक्टर-ट्राॅली अंगावरून गेल्यामुळे जागी ठार झाला. त्याच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, दोन मुलगी, आई असा परिवार आहे.
किरकोळ वाद
अनंत दरेकर याचा दोन दिवसांपूर्वीच वाढदिवस झाला होता. वाढदिवसाची पार्टी म्हणून पेठवडगाव येथे मित्रांना जेवण दिले आणि तिथे चेष्टामस्करीतून किरकोळ वाद झाला त्यामुळे दरेकर चालत आला आणि टोप येथे अपघात झाला. तो चालत आला नसता तर वाचला असता. तो गवंडीकाम करत होता अतिशय कष्टाळू आणि प्रामाणिक होता.