Kolhapur News: वाकरेत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 17:46 IST2023-01-17T17:46:21+5:302023-01-17T17:46:46+5:30
करवीर पोलिसात घटनेची नोंद

Kolhapur News: वाकरेत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
प्रकाश पाटील
कोपार्डे - वाकरे पैकी पोवारवाडी(ता. करवीर) येथील तरुणाने दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. नितीन विलास मोरे (वय २२) असे या तरुणाचे नाव आहे. काल, सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली आहे. या घटनेची नोंद करवीर पोलिसात झाली आहे.
मिळालेली माहिती अशी की, नितीनचे महाविद्यालयीन शिक्षण सुरू आहे. तो मोटरसायकल दुरुस्ती कामाचे प्रशिक्षण घेण्यासाठी बालिंगा येथील एका दुचाकी गँरेज मध्ये गेली दोन वर्षे जात होता. आज रात्री उशिरापर्यंत तो घरी आला नाही. म्हणून घरापासून थोड्या अंतरावर असणाऱ्या जनावरांच्या गोठ्याकडे वडील विलास मोरे चौकशीसाठी गेले. विलास यांना मुलगा नितीनने तुळईला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले.
विलास मोरे यांनी आरडाओरडा केल्याने शेजारी घटनास्थळी धावून आले. त्यानंतर नितीनला कोल्हापूर येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तरुण व अत्यंत शांत स्वभावाच्या नितीनने आत्महत्या केल्याने गावात आश्चर्य व दुःख व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ आहे.