प्राणघातक शस्त्रे विक्रीसाठी घेऊन आलेल्या तरुणास अटक, ५० हजाराचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2021 01:50 PM2021-12-25T13:50:54+5:302021-12-25T14:01:16+5:30

कोल्हापूर : विनापरवाना प्राणघातक शस्त्रे विक्रीसाठी घेऊन आलेल्या तरुणास पोलिसांनी अटक केली. पियूष रायगोंडा पाटील (वय २० रा. पांडव ...

Youth arrested for selling deadly weapons in kolhapur | प्राणघातक शस्त्रे विक्रीसाठी घेऊन आलेल्या तरुणास अटक, ५० हजाराचा मुद्देमाल जप्त

प्राणघातक शस्त्रे विक्रीसाठी घेऊन आलेल्या तरुणास अटक, ५० हजाराचा मुद्देमाल जप्त

googlenewsNext

कोल्हापूर : विनापरवाना प्राणघातक शस्त्रे विक्रीसाठी घेऊन आलेल्या तरुणास पोलिसांनी अटक केली. पियूष रायगोंडा पाटील (वय २० रा. पांडव गल्ली, कुंभोज, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

त्याच्याकडून ५० हजार रुपये किंमतीच्या एकूण सहा तलवारी व दुचाकी जप्त केल्या. ही कारवाई हातकणंगले ते कुंभोज रस्त्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या इचलकरंजी पथकाने केली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कुंभोज येथील पियूष पाटील याच्याकडे बेकायदेशीर तलवारी असून तो विक्री करण्यासाठी हातकणंगले ते कुंभोज रस्त्यावर एका हॉटेलनजीक येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकास मिळाली. त्या पथकाने त्या रस्त्यावर सापळा लावला.

त्यावेळी पियूष आपल्या दुचाकीवरुन तलवारी घेऊन विक्रीसाठी आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ गोणपाटात धारदार सहा तलवारी आढळल्या, त्या तलवारीसह त्याच्याजवळील दुचाकी असा सुमारे ५० हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. त्याच्याविरुध्द भारतीय हत्याराचा कायदा कलमान्वये हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पो.नि. प्रमोद जाधव यांच्या सुचनेनुसार सहा. पो. नि. किरण भोसले, पोलीस राजीव शिंदे, फिरोज बेग, आयुब गडकरी, सुरज चव्हाण यांनी केली.

Web Title: Youth arrested for selling deadly weapons in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.