शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

कोल्हापुरातील मालमत्तेवरून अपहरण करून तरुणाचा खून, आईची सुटका; पाच जणांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 12:15 IST

मामाच्या मुलानेच रचला कट

मुंबई/कोल्हापूर : मालमत्तेच्या लोभापोटी माय-लेकाचे अपहरण करून त्यातील मुलाचा खून करणाऱ्या पाच नराधमांना चेंबूर पोलिसांनी अटक केली. ५ एप्रिलपासून हे माय-लेक बेपत्ता होते. अखेरीस वृद्धेची सुटका करण्यात पोलिसांना यश आले असले तरी, मुलाचा खून केल्याची कबुली पाच जणांनी दिली आहे. विशाल वसंत कांबळे (वय ४४, रा. आर. के. नगर, कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे. विशालचा पनवेल येथे खून करून त्याचा मृतदेह बडोदा-अहमदाबाद महामार्गाच्या कडेला फेकून देण्यात आला आहे. रोहिणी वसंत कांबळे (वय ८०, रा. आर. के. नगर, कोल्हापूर ) यांची चेंबूर पोलिसांनी सुटका केली. याप्रकरणी चेंबूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक एकनाथ देसाई यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मृत विशाल हा सेवानिवृत्त पोलिस अधिकारी वसंत कांबळे यांचा मुलगा आहे.मूळचे कोल्हापुरातील आर. के. नगर येथील रोहिणी कांबळे आणि विशाल कांबळे या दोघांचे ५ एप्रिल रोजी चेंबूर येथील हॉटेलमधून अपहरण करण्यात आले. कोल्हापुरातील मालमत्तेवरून कोर्ट कचेरी सुरू असल्याने दोघे मुंबईत आले होते. रोहिणी यांच्या बहिणीने दोघे बेपत्ता झाल्याची तक्रार २१ एप्रिलला पोलिसांत नोंदवली. अखेरीस २ मे रोजी या बेपत्ता नाट्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले.निलंबित बेस्ट बसचालक मुनीर पठाण (४१, वडाळा), चालक रोहित अदमाने (४०, पवई), राजू दरवेश (४०, मीरा रोड), केअर टेकर ज्योती वाघमारे (३३, मानखुर्द) आणि प्रणव रामटेके (२५, रा. कोल्हापूर) या पाच जणांनी कांबळे माय-लेकाचे अपहरण केले. रोहिणी कांबळे यांना सुरुवातीला राजस्थानात एका ठिकाणी डांबून ठेवले. त्यानंतर गोरेगावातील रॉयल पाम ब्लॉक सेक्टरमध्ये ठेवले.दुसरीकडे मुलगा विशाल याला मालमत्ता खरेदी- विक्रीच्या बैठकीसाठी पनवेलला नेऊन एका व्हिलामध्ये खून करून त्याचा मृतदेह बडोदा-अहमदाबाद महामार्गाच्या कडेला फेकून देण्यात आला. कांबळे माय-लेकाची मालमत्ता मिळविण्यासाठी हा कट रचण्यात आल्याची कबुली पाचही जणांनी दिली आहे. तपास सुरू असल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला.

मामाच्या मुलानेच रचला कटकोल्हापुरातून अटक करण्यात आलेला प्रणव रामटेके हा कांबळे यांच्या मामाचा मुलगा आहे. त्यानेच मालमत्ता हडपण्यासाठी हा कट रचल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

सेवानिवृत्त पोलिस अधिकारीआर. के. नगर येथील वसंत कांबळे हे सेवानिवृत्त पोलिस अधिकारी होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांचे निधन झाले अशी माहिती परिसरातील नागरिकांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस