शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

‘युवा नेक्स्ट’ सदस्यांनी साधला ‘बाजी’ कलाकारांशी संवाद

By admin | Updated: January 23, 2015 00:39 IST

श्रेयस आणि ‘नटरंग’फेम अमृता खानविलकरची भूमिका यामुळे ‘बाजी’ युवावर्गाची गर्दी खेचणार, असा विश्वास जितेंद्र जोशीने व्यक्त केला़

कोल्हापूर : कदमवाडी येथील भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूूट आॅफ मॅनेजमेंटच्या युवक-युवतींनी प्रसिद्ध अभिनेते श्रेयस तळपदे, जितेंद्र जोशी आणि अभिनेत्री अमृता खानविलकर या कलाकारांशी मुक्त संवाद साधला. या तिघांची प्रमुख भूमिका असलेला ‘बाजी’ हा अ‍ॅक्शन चित्रपट सहा फेब्रुवारीला महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनासाठी आज, गुरुवारी शहरात आलेल्या या सुपरस्टार्सनी ‘बाजी’ हा मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अ‍ॅक्शन चित्रपट ठरणार असल्याचा दावा केला. ‘लोकमत युवा नेक्स्ट’ आणि भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट आॅॅफ मॅनेजमेंट यांच्यातर्फे हा कार्यक्रम कदमवाडी येथील कॉलेज कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक निखिल महाजन आहेत. यावेळी चित्रपटाची कथा, प्रमुख भूमिका याविषयी प्रश्न विचारण्यासाठी कॉलेजीयन्सनी श्रेयस, अमृता आणि जितेंद्र या त्रयीला अक्षरश: गराडा घातला. श्रेयस तळपदे ‘बाजी’ मध्ये नायकाची भूमिका करीत असून, अमृता खानविलकर नायिकेच्या भूमिकेत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘दुनियादारी’त खलनायकाच्या भूमिकेत असलेल्या जितेंद्र जोशीने ‘मार्तंड’ या पात्राची भूमिका साकारली आहे. अमृता खानविलकर साध्या स्त्रीच्या भूमिकेत आहे.श्रेयस आणि ‘नटरंग’फेम अमृता खानविलकरची भूमिका यामुळे ‘बाजी’ युवावर्गाची गर्दी खेचणार, असा विश्वास जितेंद्र जोशीने व्यक्त केला़ यावेळी भारती विद्यापीठ-इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंटचे संचालक डॉ. नितीन नायक, प्रा. डॉ. बी. आर. पाटील, आदी उपस्थित होते. सोनाली सदरे हिने सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)