Kolhapur Crime: एकमेकांकडे रागाने बघण्याचे कारण, धारधार शस्त्राने वार करुन तरुणाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 11:51 IST2025-07-07T11:50:32+5:302025-07-07T11:51:51+5:30
कुरुंदवाड: एकमेकांकडे रागाने बघण्याच्या कारणावरुन तीन अज्ञात हल्लेखोरांनी धारधार शस्त्राने वार करुन तरुणाचा खून केला. अक्षय दिपक चव्हाण (वय ...

Kolhapur Crime: एकमेकांकडे रागाने बघण्याचे कारण, धारधार शस्त्राने वार करुन तरुणाचा खून
कुरुंदवाड: एकमेकांकडे रागाने बघण्याच्या कारणावरुन तीन अज्ञात हल्लेखोरांनी धारधार शस्त्राने वार करुन तरुणाचा खून केला. अक्षय दिपक चव्हाण (वय २६) असे मृताचे नाव आहे. काल, रविवारी (दि.७) मध्यरात्रीच्या सुमारास माळ भागावरील एका हॉटेलसमोर ही घटना घडली.
खुनाची माहिती समजताच अप्पर पोलिस अधीक्षक आण्णासाहेब जाधव, पोलिस उप अधीक्षक समीरसिंह साळवे घटनास्थळी दाखल झाले. अज्ञात आरोपी फरारी असून त्यांच्या शोधासाठी तीन पथके रवाना झाली आहेत. पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस अधिक तपास करीत असून खुनाच्या नेमक्या कारणाचा शोध सुरु आहे.