टेम्पो उलटून जयसिंगपूरचा तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:27 IST2021-09-21T04:27:53+5:302021-09-21T04:27:53+5:30

* पाचजण जखमी शिरोळ : गणेश विसर्जनासाठी निघालेला टेम्पो उलटून झालेल्या अपघातात जयसिंगपूरचा तरुण ठार झाला. तर मंडळाचे पाच ...

Young man from Jaisingpur killed by reversing tempo | टेम्पो उलटून जयसिंगपूरचा तरुण ठार

टेम्पो उलटून जयसिंगपूरचा तरुण ठार

* पाचजण जखमी

शिरोळ : गणेश विसर्जनासाठी निघालेला टेम्पो उलटून झालेल्या अपघातात जयसिंगपूरचा तरुण ठार झाला. तर मंडळाचे पाच कार्यकर्ते जखमी झाले. सिध्दू लिंगाप्पा पिडाई (वय २६, रा. सातवी गल्ली राजीव गांधीनगर) असे मृताचे नाव असून हा अपघात शिरोळ-जयसिंगपूर मार्गावर घडला.

सुमित बडबडे, वरद मगदूम, आशपाक शेख, सद्दाम पठाण, रमेश हिटनाळे (सर्व रा. राजीव गांधीनगर) अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची वर्दी सूर्यकांत मुडलगी यांनी पोलिसात दिली.

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, जयसिंगपूर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते गणपती विसर्जनाची शिरोळकडे निघाले होते. ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये गणपतीची मूर्ती घेऊन कार्यकर्ते बसले होते. तर ट्रॅक्टर पाठोपाठ मालवाहतूक टेम्पोमधून कार्यकर्ते निघाले होते. शनिवारी रात्री डॉ.जे.जे. मगदूम कॉलेजजवळ शिरोळकडे जाणाऱ्या वळणावर टेम्पोचालक रमेश हिटनाळे याचा ताबा सुटल्याने भरधाव टेम्पो उलटला. या अपघातात सिध्दू पिडाई याच्या डोकीस गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. तर अन्य पाच कार्यकर्ते जखमी झाले. सिध्दू हा मजुरीचे काम करीत होता. कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर होती. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, भाऊ असा परिवार आहे.

फोटो - २००९२०२१-जेएवाय-०३-मृत सिध्दू पिडाई

Web Title: Young man from Jaisingpur killed by reversing tempo