जयसिंगपूर येथे विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:22 IST2021-04-12T04:22:25+5:302021-04-12T04:22:25+5:30

जयसिंगपूर : जयसिंगपूर महाविद्यालयातील जलतरण तलाव स्वच्छ करीत असताना विजेचा धक्का लागून कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. शीतल दौलत बाबर ...

Young man dies in electric shock in Jaisingpur | जयसिंगपूर येथे विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

जयसिंगपूर येथे विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

जयसिंगपूर : जयसिंगपूर महाविद्यालयातील जलतरण तलाव स्वच्छ करीत असताना विजेचा धक्का लागून कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. शीतल दौलत बाबर (वय २६, रा. शाहूनगर जयसिंगपूर) असे मृताचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास उघडकीस आली.

पोलिसांनी सांगितले की, शीतल हा जयसिंगपूर महाविद्यालयामध्ये शिपाई म्हणून काम करीत होता. महाविद्यालयामध्ये असलेला जलतरण तलाव स्वच्छ करत असताना तलावामध्ये असलेल्या पाण्याच्या मोटारीचा विजेचा धक्का बसला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. याबाबतची वर्दी प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांनी पोलिसांत दिली. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे.

फोटो - ११०४२०२१-जेएवाय-०८-शीतल बाबर

Web Title: Young man dies in electric shock in Jaisingpur