शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

यड्रावमध्ये उसाचा ट्रॅक्टर पानपट्टीमध्ये घुसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:23 IST

यड्राव : ऊस वाहतूक ट्रॅक्टरच्या आडवे आलेल्या दुचाकीला वाचविताना ट्रॅक्टर रस्त्यालगत असणाऱ्या पानपट्टीच्या खोक्यात घुसल्याने पानपट्टी चालक किरकोळ जखमी ...

यड्राव : ऊस वाहतूक ट्रॅक्टरच्या आडवे आलेल्या दुचाकीला वाचविताना ट्रॅक्टर रस्त्यालगत असणाऱ्या पानपट्टीच्या खोक्यात घुसल्याने पानपट्टी चालक किरकोळ जखमी झाला. ही घटना जयसिंगपूर मार्गावरील पार्वती औद्योगिक वसाहतीजवळ संगमनगर फाटा येथे सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.

पंचगंगा साखर कारखान्याकडे ऊस वाहतूक सुरू होती. अचानकपणे ट्रॅक्टरसमोर दुचाकीस्वार आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर रस्त्यालगत असलेल्या गजानन नरसाळे यांच्या पानपट्टीत घुसला. यावेळी नरसाळे पानपट्टीत होते. पण सुदैवाने किरकोळ जखमी झाले.

अपघातामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या घटनेची माहिती समजताच शहापूरचे पोलीस उपनिरीक्षक गणेश खराडे, शशिकांत ढोणे, बापू खरजे, आसिफ शिराजभाई यांनी घटनास्थळी दाखल होऊन गर्दीला हटवून वाहतूक सुरळीत केली. रात्री उशिरापर्यंत शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

फोटो - १३०३२०२१-जेएवाय-०४

फोटो ओळ -

पार्वती औद्योगिक वसाहतीजवळ चालकाचा ताबा सुटल्याने उसाने भरलेला ट्रॅक्टर पानपट्टीमध्ये घुसला.