शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
3
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
4
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
5
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
6
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
7
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
8
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
9
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
10
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
11
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
12
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
13
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
14
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
15
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
16
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
17
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
18
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
19
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
Daily Top 2Weekly Top 5

धर्मनिरपेक्षता संकल्पनेबाबत चुकीचा प्रचार--अवि पानसरे व्याख्यानमाला

By admin | Updated: December 9, 2014 23:54 IST

झहीर अली : धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व हा भारतीय लोकशाहीचा आत्मा

कोल्हापूर : धर्मनिरपेक्षता ही संकल्पना कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. विशिष्ट घटकांकडून धर्मनिरपेक्षता या संकल्पनेबाबत चुकीचा प्रचार केला जात आहे. भारत हा विविध जाती-धर्माचा देश असल्यामुळे धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व हा भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे. त्यामुळे धर्मावर आधारित राष्ट्रनिर्मितीचा प्रयत्न झाल्यास या देशातील जनता स्वस्थ बसणार नाही. कारण धर्मनिरपेक्षतेमुळेच भारताची अखंडता टिकली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ राजकीय विश्लेषक झहीर अली यांनी केले. श्रमिक प्रतिष्ठानच्यावतीने येथील शाहू स्मारक भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कॉम्रेड अवि पानसरे व्याख्यानमालेत ते बोलत होते. धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी सकाळचे मुख्य संपादक श्रीराम पवार होते. अली म्हणाले, भारतीय घटनेचे स्वरूप समाजवादी लोकशाहीचे आहे. भारताने १९५० मध्ये स्वीकारलेल्या घटनेत ‘धर्मनिरपेक्षता’ हा शब्द नमूद केला नसला तरी तिचा आत्मा हा धर्मनिरपेक्षतावादी होता. सामाजिक विषमता निर्माण करणाऱ्या घटकांना घटनेने बंदी घातली असली तरी, एखाद्या धर्माच्या आचार-विचारांमध्ये घटनेने हस्तक्षेप केलेला नाही. देशात अनेक ठिकाणी मंदिरे ही पब्लिक बजेटतून बांधली आहेत. मंदिरांसाठी वापरल्या जाणाऱ्या पैशांत अनेक धर्मियांचाही पैसा असतो अशावेळी घटनेने कधी हस्तक्षेप केलेला नाही. त्यामुळे घटनेतील धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व कोणत्याही धर्माच्या आचरणामध्ये हस्तक्षेप करते, असे म्हणणे हा अप्प्रचार आहे. या देशातील सर्वसामान्य जनता ही धार्मिक आहे. त्यांच्या धार्मिकतेचा आदर घटनाकारांनी केला आहे. विशिष्ट जात, धर्म, वंश, प्रांत आणि भाषा यांचा पुरस्कार न करता देशाची अखंडता टिकवण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. धर्माच्या आधारावर या देशाची अखंडता भंग करण्याचा प्रयत्न झाल्यास, आपण संघर्षासाठी तयार राहिले पाहिजे. भाजपच्या भांडवलधार्जिण्या आणि फसव्या आश्वासनांवर टीका करताना अली म्हणाले, भांडवलदारांना आणि मध्यमवर्गीयांना हाताशी धरून गोबेल्स पद्धतीच्या प्रचाराने लोकसभा निवडणूक जिंकली आहे. सत्तेवर येताच १०० दिवसांत काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन मोदी सरकारने दिले होते. शंभर दिवस संपून सहा महिने होत आले, तरी काळा पैसा परत आणलेला नाही. देशाचा विकास हा सामाजिक दृष्टिकोनातून व्हायला हवा. त्यातून रोजगारनिर्मिती व्हायला हवी, यंत्राचा वापर वाढवून उच्चशिक्षितांनाच नोकऱ्या देऊन गोरगरिबांना रोजगारच न देण्याचे षङ्यंत्र सुरू आहे. सेझ, माध्यमे आणि मध्यमवर्गीयांच्या आडून भांडवलशाहीच्या पाठिंब्यावरची लोकशाही या सरकारला उभी करायची आहे. जनतेचा सहभाग केवळ मतदानापुरता राहिला आहे, हे आपण ओळखले पाहिजे, असे मतही अली यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात श्रीराम पवार म्हणाले, धर्मनिरपेक्षतेच्या बुरख्याआड राजकीय पोळी भाजून घेणाऱ्यांचे थोतांड धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करणाऱ्या सच्च्या कार्यकर्त्यांनी उघड केले पाहिजे.