शिवाजी विद्यापीठातर्फे रविवारी लेखी परीक्षा

By Admin | Updated: December 17, 2014 22:57 IST2014-12-17T22:25:55+5:302014-12-17T22:57:13+5:30

६४ जागांचा समावेश : वर्ग-३, वर्ग-४ पदांच्या होणार भरती

Written Examination by Shivaji University on Sunday | शिवाजी विद्यापीठातर्फे रविवारी लेखी परीक्षा

शिवाजी विद्यापीठातर्फे रविवारी लेखी परीक्षा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या ‘वर्ग-३’ व ‘वर्ग-४’ च्या पदभरतीची लेखी परीक्षा रविवारी (दि. २१) घेण्यात येणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती विद्यापीठीच्या वेबसाईटवर उपलब्ध असून, उमेदवारांनी ती पहावी, असे आवाहन कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे यांनी केले आहे.
शिवाजी विद्यापीठात भांडारपाल, तंत्रज्ञ कम प्रयोगशाळा, सहायक, लघुलेखक, सांख्यिकी सहायक, ओव्हरसिअर (आवेक्षक), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, गार्डन असिस्टंट, कनिष्ठ सहायक, प्रकल्प अधिकारी, अभिरक्षक, चित्ररक्षक सहायक, डाटा एंट्री आॅपरेटर, वाहनचालक, पंप आॅपरेटर, सहायक प्लंबर आणि शिपाई अशा सर्व मिळून एकूण ६४ जागांचा समावेश आहे. शिवाजी विद्यापीठासह कोल्हापूरमधील विविध केंद्रांवर ती होईल. वर्ग-४ साठीची परीक्षा सकाळी ११ ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत होईल, तर वर्ग-३ साठीची परीक्षा केंद्रनिहाय व बैठक क्रमांक निहाय बैठक व्यवस्थेची माहिती शिवाजी विद्यापीठाच्या ६६६.४ल्ल्र२ँ्र५ं्न्र.ंू.्रल्ल/१ीू१४्र३ेील्ल३२ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवारांनी आपली बैठक व्यवस्था कोणत्या केंद्रावर आहे, ते पाहावे. पात्र उमेदवारांना त्यांचे लेखी परीक्षेस उपस्थित राहणेबाबतचे पत्र पोस्टाने पाठविण्यात आले आहे. उमेदवारांनी सर्वप्रथम विद्यापीठाच्या संकेतस्थळास भेट देऊन पात्र उमेदवारांच्या यादीत आपले नाव असल्याची खात्री करावी. तसेच, त्यानंतर आपला परीक्षा बैठक क्रमांक, परीक्षा केंद्र, आदी माहिती संकेतस्थळावरून घ्यावी आणि त्यानुसार परीक्षेस उपस्थित राहावे. परीक्षेस उपस्थित राहताना आपले छायाचित्र असलेले कोणतेही शासनमान्य ओळखपत्र (जसे की, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, आदी ) सोबत ठेवावे, असे आवाहनही कुलसचिव मुळे यांनी केले आहे.

Web Title: Written Examination by Shivaji University on Sunday