राज्यातील कुस्तीगीरांचा रविवारी कोल्हापुरात मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:57 IST2021-02-05T06:57:10+5:302021-02-05T06:57:10+5:30

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघ आणि जिल्हा कुस्ती मल्लविद्या यांच्यातर्फे आंबेवाडीतील पन्हाळारोडवरील श्री दत्त समर्थ सांस्कृतिक ...

Wrestlers of the state should meet in Kolhapur on Sunday | राज्यातील कुस्तीगीरांचा रविवारी कोल्हापुरात मेळावा

राज्यातील कुस्तीगीरांचा रविवारी कोल्हापुरात मेळावा

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघ आणि जिल्हा कुस्ती मल्लविद्या यांच्यातर्फे आंबेवाडीतील पन्हाळारोडवरील श्री दत्त समर्थ सांस्कृतिक भवनात रविवारी (दि. ३१) राज्यातील कुस्तीगीरांचा प्रथमच मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे उद्घाटन शाहू छत्रपती यांच्या हस्ते व अर्जुनवीर काका पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे, अशी माहिती महासंघाचे संस्थापक गणेश मानुगडे यांनी गुरुवारी दिली.

मानुगडे म्हणाले, राज्यातील कुस्तीला ऊर्जितवस्था यावी, नवोदित मल्लांना प्रोत्साहन मिळावे. जुन्या जाणत्या कुस्तीगीरांचे कर्तृत्व नव्या पिढीसमोर यावे. हा आदर्श घेऊन कुस्तीतून स्वर्गीय खाशाबांसारखे दिग्गज मल्ल घडावेत. याकरिता मल्लविद्या महासंघातर्फे प्रथमच राज्यातील नव्या जुन्या दिग्गज कुस्तीगीरांचा यथोचित सन्मान व मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याचे कार्याध्यक्ष म्हणून अर्जुनवीर मल्ल पोलीस उपअधीक्षक राहुल आवारे हे भूषविणार आहेत, तर हिंदकेसरी दीनानाथसिंह, ऑलिम्पिकवीर बंडा पाटील, हिंदकेसरी विनोद चौगुले, महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम, महाराष्ट्र केसरी संभाजी पाटील, महाराष्ट्र केसरी नामदेव मोळे, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड, महान महाराष्ट्र केसरी दिलीप भरणे, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, कुस्ती स्रमाट अस्लम काझी, हिंदकेसरी संतोष वेताळ, सेना केसरी गुंडाची पाटील, उपमहाराष्ट्र केसरी रवींद्र पाटील, वैभव लांडगे, पृथ्वीराज पवार , वस्ताद विश्वास हारुगले, दीपक पाटील, आनंदराव धुमाळ, रणजित जाधव, आदींचा गौरव केला जाणार आहे. यावेळी प्रवक्ते संग्राम कांबळे, शहराध्यक्ष बाबा महाडिक, जिल्हा चिटणीस प्रकाश पोवार, उपाध्यक्ष नारायण गाडगीळ, पाचगावचे सरपंच संग्राम पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Wrestlers of the state should meet in Kolhapur on Sunday