शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

कोरोनामुळे रक्तगाठ झालेला जगातील पहिला रुग्ण कोल्हापुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 2:16 PM

CPR Hospital kolhapur- कोरोनामुळे हातामध्ये रक्तगाठ झाल्याचा जगातील पहिला रुग्ण म्हणून शाहूवाडी तालुक्यातील बांबवडेच्या रुग्णाची नोंद झाली आहे. कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार करण्यात आले होते.

ठळक मुद्देकोरोनामुळे रक्तगाठ झालेला जगातील पहिला रुग्ण कोल्हापुरातआंतरराष्ट्रीय जर्नलने घेतली दखल, सीपीआरच्या डॉक्टरांची कामगिरी

समीर देशपांडेकोल्हापूर : कोरोनामुळे हातामध्ये रक्तगाठ झाल्याचा जगातील पहिला रुग्ण म्हणून शाहूवाडी तालुक्यातील बांबवडेच्या रुग्णाची नोंद झाली आहे. कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार करण्यात आले होते.

सीपीआरमधील राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांच्या या सामूहिक कामगिरीची नोंद इंटरनॅशनल जर्नल ऑफ कार्डिओव्हस्क्युलर रिसर्च यामध्ये घेण्यात आली आहे.कोरोनाचा कहर सुरू झाला असताना अगदी सुरुवातीच्या काळात २८ मार्च २०२० रोजी हा कोरोना पॉझिटिव्ह ५२ वर्षांचा पुरुष रुग्ण दाखल झाला होता. सातव्या दिवशी त्याच्या डाव्या हातामध्ये कळा सुरू झाल्या आणि हाताची बोटे काळी पडायला सुरुवात झाली.

हृदयातून शुद्ध रक्ताचा पुरवठा करणाऱ्या तीन मुख्य रक्तवाहिन्यांपैकी एका रक्तवाहिनीमध्ये ही गाठ असल्याने रुग्णाच्या जिवाला धोका होता. त्यामुळे हृदयरोग विभागाला कल्पना दिल्यानंतर सर्व डॉक्टरांनी त्याची तपासणी केली.ही गाठ काढल्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र कोरोनाच्या काळामध्ये कोरोना रुग्णाची शस्त्रक्रिया कशी करायची याच्या मार्गदर्शक सूचनाही आलेल्या नव्हत्या. अखेर विचारविनिमय करून या गाठीमध्ये पाईप घालून रक्त पातळ होण्याची इंजेक्शन्स देण्यात आली. त्यामुळे ही गाठ विरघळली आणि रक्तपुरवठा सुरळीत झाला.

गाठ असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर केवळ सहा तासांत ही कामगिरी करण्यात आली. यासाठी जर विलंब झाला असता तर पूर्ण हात काळा पडून तो काढण्याची वेळ आली असती.ही सर्व माहिती संकलित करून ही केस स्टडी आंतरराष्ट्रीय जर्नलकडे पाठविण्यात आली. तोपर्यंत अशा पद्धतीने हातामध्ये गाठ झाल्याचा एकही प्रकार संबंधित जर्नलकडे नोंदवण्यात आलेला नव्हता. त्यामुळे या कामगिरीची दखल घेत याबाबतचे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे.यांनी हाताळली परिस्थितीहा रुग्ण दाखल झाल्यानंतर तत्कालीन डीन आणि रेडिओलॉजिस्ट डॉ. मीनाक्षी गजभिये, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अक्षय बाफना, रेडिओलॉजिस्ट डॉ. स्वेनील शहा, रक्तविकारतज्ज्ञ डॉ. वरुण बाफना, सर्जन डॉ. किशोर देवरे, डॉ. माजिद मुल्ला यांनी या रुग्णावर उपचार केले.आणखी १७ रुग्ण आढळलेमार्चमध्ये हा रुग्ण आढळल्यानंतर आतापर्यंत सीपीआर रुग्णालयामध्ये हातामध्ये रक्ताच्या गाठी झालेले १८ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. त्यांचीही संपूर्ण माहिती या जर्नलकडे पाठविण्यात आली आहे.

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयkolhapurकोल्हापूर