शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

‘जनसुराज्य’चा कार्यकर्ता भाजपच्या वाटेवर

By admin | Updated: August 18, 2015 23:54 IST

लाटकरांच्या तयारीने ढवळेंचा निर्णय : शिवसेना, भाजपकडूनही इच्छुकांची उमेदवारीची चाचपणी

प्रवीण देसाई - कोल्हापूर--महापालिकेतील पारंपरिक मित्र असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिवाजी पार्क (प्रभाग क्र.१६) येथे उडी घेतल्याने येथील जनसुराज्य पक्षाच्या उमेदवाराची गोची झाली आहे. राष्ट्रवादीचे गटनेते राजेश लाटकर यांनी या प्रभागातून निवडणूक लढवायचा निर्णय घेतल्याने येथील ‘जनसुराज्य’चे कार्यकर्ते व माजी स्थायी समिती सभापती आशिष ढवळे यांनी पक्षाला ‘रामराम’ करीत भाजपकडे उमेदवारी मागितली आहे. येथून शिवसेनेचे उपशहरप्रमुख विश्वजित मोहिते यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. नगरसेविका अपर्णा आडके यांचे पती नितीन आडके यांनीही तयारी सुरू केली असून, पक्ष कुठला हा निर्णय त्यांनी गुलदस्त्यात ठेवला आहे. उत्तम पाटील-भेडसगांवकर यांनीही भाजपकडे चाचपणी सुरू केली आहे. उच्चभ्रू, मध्यमवर्गीय लोकवस्तीसह झोपडपट्टीचा काही भाग अशी या प्रभागाची रचना असून येथे मध्यमवर्गीय नोकरदार, व्यापारी, उद्योगपती, कामगारांचे वास्तव्य आहे. नव्या प्रभाग रचनेत या प्रभागातील फे्रंडस् कॉलनी, चंद्रप्रभू कॉलनी हा भाग कमी होऊन मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील महालक्ष्मी चेंबर्स, अयोध्या टॉवर्स, जुने शाहूपुरी पोलीस ठाणे, दाभोळकर कॉर्नर, आदी भागाचा समावेश झाला आहे. सुमारे साडेसहा हजार मतदारसंख्येच्या प्रभागात यंदा तुल्यबळ लढत होण्याची चिन्हे आहेत.राष्ट्रवादीचे नगरसेवक व गटनेते राजेश लाटकर यांनी शिवाजी पार्क येथून निवडणूक लढवायची तयारी सुरू केली आहे. त्यांचा सदर बाजार हा प्रभाग सर्वसाधारण महिलेसाठी खुला झाल्याने व त्यांचे निवासस्थानही या प्रभागात येत असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. नगरसेवक व स्थायी समिती सभापतिपदाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या प्रभागात अनेक विकासकामे केली आहेत. त्याचबरोबर आपल्या प्रभागापुरता विचार न करता शहराच्या विकासाबाबत असणारी नजर आणि काम करून घेण्याची हातोटी या गोष्टींमुळे या प्रभागातून ते नशीब आजमावणार असल्याची चर्चा आहे. आमदार हसन मुश्रीफ यांचे ‘विश्वासू कार्यकर्ते’ असल्याने राष्ट्रवादीची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.आशिष ढवळे यांनी तयारी सुरू केली आहे. महापालिकेत राष्ट्रवादी-जनसुराज्य आघाडी असली तरी उमेदवारी आपल्याला मिळणार नाही, हे गृहीत धरून त्यांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली आहे. त्यांनी २००५मध्ये या प्रभागातून प्रतिनिधित्व केले आहे. ‘जनसुराज्य’च्या माध्यमातून स्थायी समिती सभापतिपदही भूषविले आहे. त्यांनी प्रभागात अनेक विकासकामे केली असून त्या बळावरच ते रिंगणात उतरले आहेत. गतनिवडणुकीत त्यांच्या पत्नी अनिता ढवळे यांचा अवघ्या २१ मतांनी पराभव झाला होता.या प्रभागाच्या विद्यमान नगरसेविका अपर्णा आडके यांचे पती नितीन आडके यांनी यावेळी रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यकर्ते व भागातील नागरिक यांच्याशी चर्चा करून कुठला पक्ष निवडायचा याबाबत ते निर्णय घेणार असले तरी त्यांना काँग्रेस पक्षाकडून तिकिटाची विचारणा झाली आहे. २०००मधील निवडणुकीत ज्येष्ठ नगरसेवक बापूसाहेब मोहिते यांच्याकडून चार मतांनी पराभूत झाले होते. सध्या पत्नी अपर्णा आडके प्रभागाचे नेतृत्व करत असून त्यांनी विविध विकासकामे केली आहेत.विश्वजित मोहिते यांनीही तयारी सुरू केली आहे. ते आमदार राजेश क्षीरसागर यांचे ‘विश्वासू सहकारी’ असल्याने त्यांच्या माध्यमातून निधी आणून अनेक विकासकामे केली आहेत. गतनिवडणुकीत त्यांच्या पत्नी वंदना यांचा १५० मतांनी पराभव झाला होता. पराभव होऊनही मोहिते यांनी प्रभागात संपर्क कायम ठेवला आहे. उत्तम पाटील-भेडसगांवकर यांनीही उमेदवारी जाहीर करून तयारी सुरू केली आहे. ते गेल्या दहा वर्षांपासून प्रभागातील विविध सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग आहे. ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन व कोल्हापूर जिल्हा लुब्रिकेंट्स असोसिएशनच्या माध्यमातून ते कार्यरत आहेत. ते भाजपकडून इच्छुक आहेत.असा आहे प्रभाग शिवाजी पार्क, स्टार बाजार, विक्रम हायस्कूल, ताराराणी फायर स्टेशन रोड दोन्ही साईट परिख पुलापर्यंत, दाभोळकर कॉर्नर, हॉटेल कोहिनूर स्क्वेअर, अमात्य टॉवर, हॉटेल अ‍ॅट्रिया ते एम. आर. देसाई हॉस्पिटल.