शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

सव्वाआठ हजार रूग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अपलोडचे काम बाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यातील ८,८१३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची काॅन्टॅक्ट ट्रेसिंगची माहिती अजूनही अपलोड करणे बाकी असल्याने राज्यस्तरावरून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्ह्यातील ८,८१३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची काॅन्टॅक्ट ट्रेसिंगची माहिती अजूनही अपलोड करणे बाकी असल्याने राज्यस्तरावरून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. याची पूर्तता करणे हे आता महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेसमोर आव्हान बनले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांनी याबाबत सर्व गटविकास अधिकाऱ्यांना पत्र पाठवून तातडीने काही प्रमाणात शिल्लक राहिलेले ट्रेसिंग आणि माहिती अपलोड करण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत.

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा हा ५० हजारांहून अधिक नोंदवला गेला आहे. मात्र, त्यापैकी ४४ हजार २९६ रुग्णांच्या काॅन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम पूर्ण झाले आहे; परंतु ८,३१३ रुग्णांच्या ट्रेसिंगची माहिती अपलोड करण्याचे काम अजूनही बाकी आहे. यामध्ये सर्व नगरपालिका आणि बाराही तालुक्यांचा समावेश असून, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांनी याबाबत सर्वच गटविकास अधिकाऱ्यांना पत्र पाठवून हे काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

कोल्हापूर जिल्ह्याचा राज्यस्तरावरून काॅन्टॅक्ट ट्रेसिंगचा आढावा घेतला असता, जिल्ह्यातील हे काम कमी झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. प्रतिरुग्ण हायरिस्क १५ आणि लो रिस्क २० या पद्धतीने काॅन्टॅक्ट ट्रेसिंग करण्याच्या सूचना या पत्रामध्ये देण्यात आल्या आहेत. कोविडबाधित रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील सर्व नातेवाईक, नागरिक यांची माहिती १०० टक्के अपलोड झाली पाहिजे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

चौकट

बाहेरील जिल्ह्यातील २,२०० जणांचा समावेश

या शिल्लक राहिलेल्या काॅन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली जिल्ह्यांतील तसेच निपाणी, चिक्कोडी, संकेश्वर तालुक्यांतील अनेक पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. या सर्वांनी महाराष्ट्रात जरी स्वॅब दिला असला, तरीदेखील त्यांचे ट्रेसिंग हे त्या-त्या जिल्ह्यातून होणार असल्याने ही २,२०० नावे कोल्हापूर जिल्ह्याच्या यादीत दिसत आहेत.

चौकट

गेल्यावर्षीपासूनची नावे

गेल्या मार्चपासूनची नावे अजूनही अपलोड करायची राहिली आहेत. जेव्हा रुग्णसंख्या अधिक होती, तेव्हाची नोंदणी झाली आहे. मात्र, नोव्हेंबर, डिसेंबर २०२०, जानेवारी २०२१ या महिन्यांत रुग्णसंख्या खूपच कमी आली. तेव्हाची काॅन्टॅक्ट ट्रेसिंगची नावे अपलोड करणे राहिले आहे.

कोट

अशा पद्धतीने काॅन्टॅक्ट ट्रेसिंग होणे किंवा झाले असले, तरी ती नावे अपलोड करणे बाकी आहे. येत्या २० एप्रिलपर्यंत हे काम संपविण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

- मनिषा देसाई,

उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर