म्हारूळ दूध संस्था कर्मचाऱ्यांचे काम कौतुकास्पद - हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:57 IST2021-02-05T06:57:41+5:302021-02-05T06:57:41+5:30

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील म्हारूळ येथील दूध संस्था कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविराेध करत राज्यात आदर्शवत काम केल्याचे गौरवोद्गार ग्रामविकास ...

The work of Mharul Dudh Sanstha staff is commendable - Hasan Mushrif | म्हारूळ दूध संस्था कर्मचाऱ्यांचे काम कौतुकास्पद - हसन मुश्रीफ

म्हारूळ दूध संस्था कर्मचाऱ्यांचे काम कौतुकास्पद - हसन मुश्रीफ

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील म्हारूळ येथील दूध संस्था कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविराेध करत राज्यात आदर्शवत काम केल्याचे गौरवोद्गार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले.

म्हारूळ येथील सहा दूध संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत गावात एकोपा निर्माण केला आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल शनिवारी मंत्री मुश्रीफ यांनी शासकीय विश्रामगृहात या कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. मंत्री मुश्रीफ म्हणाले, गावे एकोप्याने नांदली तर विकासाचे नवे पर्व सुरू होईल. म्हारूळ गावाचा आदर्श राज्यातील इतर गावांनी घेण्यासारखा असून, बक्षीस म्हणून या गावाला विकासनिधी देऊ. यावेळी ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरूण डोंगळे, दूध संस्था कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष के. डी. पाटील, उपाध्यक्ष शामराव पाटील, जनरल सेक्रेटरी विश्वास पाटील, खजिनदार सुरेश जाधव, सरदार पाटील, रंगराव पाटील, सुभाष मांडेकर, अभिजीत चौगुले, उत्तम पाटील, संदीप पाटील, संग्राम चौगले, शिवाजी कुंभार, गणेश कुंभार, डॉ. दीपक कांबळे, दिलीप चव्हाण, सरदार पांडुरंग पाटील आदी उपस्थित होते.

फोटो ओळी : म्हारूळ (ता. करवीर) येथील दूध संस्था कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायत बिनविरोध केल्याबद्दल शनिवारी शासकीय विश्रामगृहात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अरूण डोंगळे, के. डी. पाटील, विश्वास पाटील आदी उपस्थित होते. (फाेटो-३००१२०२१-कोल- म्हारूळ)

Web Title: The work of Mharul Dudh Sanstha staff is commendable - Hasan Mushrif