शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

Women's Day 2018 कोल्हापूर : पोलिस दलातर्फे महिलांचा गौरव, विविध उपक्रमांनी महिला दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 6:22 PM

जागतिक महिला दिनानिमित्त कोल्हापूर पोलिस दलातर्फे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या रुची राणा होत्या. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नागरे पाटील, रुपाली नांगरे पाटील, भारती मोहिते व निर्भया पथकाचे अधिकारी व वुई केअर संस्थेचे सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती.

ठळक मुद्देकोल्हापूर पोलिस दलातर्फे महिलांचा गौरव विविध उपक्रमांनी महिला दिन

कोल्हापूर : जागतिक महिला दिनानिमित्त कोल्हापूर पोलिस दलातर्फे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या रुची राणा होत्या. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नागरे पाटील, रुपाली नांगरे पाटील, भारती मोहिते व निर्भया पथकाचे अधिकारी व वुई केअर संस्थेचे सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, शाहूपुरी, कोडोली पोलीस ठाणे यांच्यातर्फे विविध उपक्रम घेऊन महिला दिन साजरा झाला.यावेळी रुची राणा यांनी,दैनंदिन जीवनातील तणाव कसा कमी करायचा व कामाचे नियोजन कसे करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांनी स्वागत करुन उपस्थित महिलाना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी निर्भया पथकाच्या कामगिरीची महिती दिली.

जिल्ह्यातील कार्यरत निर्भया पथक आधिकारी व कर्मचारी यांच्या या आर्थिक वर्षाच्या चांगले कामगिरीसाठी सर्व निर्भया पथक अधिकारी व कर्मचारी यांचा विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर ‘वुई केअर समोपदेशन संस्थांतील सदस्यांचा सत्कार करण्यात आला. गडहिंग्लज विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाटगे यांनी आभार मानले.दरम्यान, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या महिला अधिकारी व कर्मचारी कामकाज पाहत होत्या. महावितरण कोल्हापूर कार्यालयातील महिलांनी आयोजित केलेल्या मोटारसायकल रॅलीचे शाहुपुरी पोलीस स्टेशन तर्फे स्वागत केले.रॅलीत सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती देशमुख यांच्यासह पोलिस महिला कर्मचारी सहभागी झाल्या होत्या.

यावेळी देशमुख यांनी, महिलांशी संवाद साधून त्यांना पोलीस विभागाबाबत माहिती दिली व त्यांच्या शंकांचे निरसन केले.यावेळी पालीस ठाण्याच्या आवारात थंडपेयपानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्यानंतर महिला मेळावा, आरोग्य शिबीर, स्नेहभोजन व भेटवस्तू वाटपाचा कार्यक्रम झाला.पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.

त्याचबरोबर कोडोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महिलांची सन्मान रॅली काढण्यात आली.यामध्ये कोडोली हायस्कुल येथे हा कार्यक्रम झाला.यावेळी महिला पोलिसांच्या सत्कार करण्यात करुन महिला सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्यासह अधिकारी,कमृचारी उपस्थित होते.

रयत क्रांती संघटनेतर्फे सन्मान...रयत क्रांती संघटना,कोल्हापूर यांच्यातर्फे पोलिस विभागात कार्यरत असणाऱ्या महिलांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी शहराध्यक्ष परेश भोसले, कार्याध्यक्ष भारत तोडकर, उपाध्यक्ष शरद नारकर, श्रीधर येसणे, करण तुपसौंदरे आदी उपस्थित होते.

 

 

 

टॅग्स :Women's Day 2018महिला दिन २०१८kolhapurकोल्हापूर