Kolhapur Crime: शिरोलीत कचरा कोंडाळ्यात सापडला महिलेचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 17:20 IST2025-04-19T17:18:13+5:302025-04-19T17:20:17+5:30
शिरोली : शिरोली एमआयडीसी पहिला फाटा येथे महामार्गालगत कचरा कोंडाळ्यात महिलेचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह सापडला. महिलेच्या अंगावरील जखमेवरून महिलेचा ...

Kolhapur Crime: शिरोलीत कचरा कोंडाळ्यात सापडला महिलेचा मृतदेह
शिरोली : शिरोली एमआयडीसी पहिला फाटा येथे महामार्गालगत कचरा कोंडाळ्यात महिलेचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह सापडला. महिलेच्या अंगावरील जखमेवरून महिलेचा मृत्यू हा संशयास्पद वाटत असून शिरोली पोलिस ठाण्यात महिलेचा मृत्यू आकस्मित असा नोंदवण्यात आला आहे. मृत महिलेचे नाव मुक्ता मारुती गोरे ( वय ६५, रा. शिरोली हायस्कूलशेजारी, मूळ गाव पुणे) आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली.
अधिक माहिती अशी शिरोली एमआयडीसी पहिला फाटा येथे महामार्गालगत सेवामार्गावर महिंद्रा शोरूम शेजारी असलेल्या कचरा कोंडाळ्यात एका महिलेचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना समजली. शिरोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश गायकवाड यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली.
श्वानपथकास पाचारण करत इतर गोष्टींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, श्वान तिथेच घुटमळले. यानंतर मृतदेह उत्तरे तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयात पाठवून दिला. उत्तरीय तपासणीचा अहवाल राखून ठेवण्यात आला असून शिरोली पोलिसांनी या महिलेचा आकस्मित मृत्यू झाल्याची नोंद केली आहे.