कोल्हापूर : एका ३३ वर्षाच्या महिलेवर गारगोटी रस्त्यावरील एका लॉजवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. सोमवारी (दि.१६) घडलेल्या या घटनेबाबत संबंधित महिलेने गुरुवारी संध्याकाळी जुना राजवाडा पोलिसांत फिर्याद दिली. या प्रकरणी प्रतीक मुळे (रा. महादेव मंदिरशेजारी, मटण मार्केटजवळ, लक्ष्मीपुरी) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून तो पसार झाला आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!मुळे हा महादेव मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या फ्लॅटमध्ये राहतो. त्याच्या फ्लॅटवर अनेक देव, देवतांचे फोटो असून त्याची तो रोज पूजा करतो. त्याच्या अंगातही येते, असे सांगण्यात येते. त्यामुळे दर गुरुवारी त्याच्या दर्शनासाठी नागरिक येत असतात. या महिलेची आणि त्याची पूर्वीची ओळख आहे. महिलेची बहीण रंकाळ्याजवळ शिवाजी पेठेत राहते. तिला कॅन्सर झाला आहे. ही बाब संबंधित महिलेने मुळे याला सांगितली.कॅन्सरवर देण्यासाठी माझ्याकडे घरगुती औषध असून ते नेण्यासाठी सोमवारी (दि.१६) दुपारी साडेतीन वाजता या महिलेला मुळे याने रंकाळ्यासमोरच्या एका महाविद्यालयासमोर बोलावले. शहराच्या दुसऱ्या टोकाला राहणारी ही महिला औषधासाठी या ठिकाणी आली.त्यानंतर मुळे याने तिला लाल रंगाच्या चार चाकी गाडीतून गारगोटी रोडवरील एका लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर दोन दिवसांनी तिने हा प्रकार घरी सांगितला आणि गुरुवारी मुळे याच्याविरोधात जुना राजवाडा पोलिसांत फिर्याद देण्यात आली. गुन्हा नोंदविताना शहर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रिया पाटील यांनी पोलिस स्टेशनला भेट दिली. पोलिस निरीक्षक किरण लोंढे पुढील तपास करत आहेत.
Web Summary : In Kolhapur, a woman was raped at a lodge on the pretext of providing medicine for her sister's cancer. The suspect, a religious man identified as Pratik Mule, is now absconding after the woman filed a police complaint.
Web Summary : कोल्हापुर में, एक महिला के बहन के कैंसर के लिए दवा देने के बहाने एक लॉज में बलात्कार किया गया। आरोपी प्रतीक मुले, महिला द्वारा पुलिस में शिकायत दर्ज कराने के बाद फरार है।