शहरं
Join us  
Trending Stories
1
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'
2
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
3
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
4
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
5
अग्रलेख: ‘नीट’ फेरपरीक्षेचा वरवंटा! लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने चिरडली जाणार
6
IPL 2026 Points Table: क्वॉलिफायर १ चे दोन प्रबळ दावेदार; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चढाओढ
7
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
8
विशेष लेख: स्वतंत्र, सतर्क, सक्रिय वकील हा लोकशाहीचा कणा!
9
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
10
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
11
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
12
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
13
मुंबईतील सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द, ठेवीदारांच्या पैशाचे काय होणार?
14
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
15
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
16
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
17
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
18
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
19
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
20
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
Daily Top 2Weekly Top 5

स्टेशन रोडवर महिलेने धावत्या बसखाली उडी मारून केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:28 IST

कोल्हापूर : कोल्हापुरात स्टेशन रोडवर एका ६५ वर्षीय वृध्देने सोमवारी सकाळी पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास धावत्या एस.टी. बसच्या चाकाखाली ...

कोल्हापूर : कोल्हापुरात स्टेशन रोडवर एका ६५ वर्षीय वृध्देने सोमवारी सकाळी पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास धावत्या एस.टी. बसच्या चाकाखाली स्वत:ला झोकून देऊन आत्महत्या केली. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. नेहमी गजबजलेल्या या मार्गावर घटना घडल्याने काहीवेळ गोंधळ उडाला. पेहराव्यावरून ही महिला ग्रामीण भागातील असावी, असा पोलिसांचा अंदाज असून सायंकाळपर्यंत तिची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. महिलादिनीच महिलेवर आत्महत्या करण्याची वेळ आल्याने घटनास्थळी नागरिकांतून हळहळ व्यक्त होत होती.

वय सुमारे ६५ वर्षे तसेच नऊवारी साडी नेसलेली ही महिला स्टेशन रोडवर व्हिनस कॉर्नरनजीक रस्त्याच्या मध्येच आयलॅंडवर बसली होती. सकाळी पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानकाकडून बाहेर पडलेली एस.टी. बस दसरा चौकाच्या दिशेने जात असताना या महिलेने या धावत्या एस.टी. बसच्या मागील चाकाखाली उडी मारून आत्महत्या केली. बस चालकाच्या ही बाब लक्षात आली नाही. बसच्या पाठीमागून जाणाऱ्या दुचाकीचालकांच्या ही बाब लक्षात आली, त्यांनी ही अपघातग्रस्त बस दसरा चौकात आडवली. संबंधीत महिलेच्या पाठीवरून बसचे चाक गेल्याने ती जागीच गतप्राण झाली होती.

या अपघातामुळे वाहतुकीची कोंडी झाली. तातडीने १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली, त्यामधून मृतदेह तातडीने सीपीआर रु्ग्णालयात नेऊन रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कमी केली. सायंकाळपर्यंत महिलेची ओळख पटली नव्हती.

संबंधीत महिलेचे वय अंदाजे ६५ वर्षे असून तिच्या अंगावर हिरव्या रंगाची पांढरे टिपके असणारी साडी होती. पेहराव्यावरून ती ग्रामीण भागतील असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

स्टॅन्डवरून हटवले

संबंधीत महिलेने सोमवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानक परिसरातही बसखाली झोपून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बाब आगार सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिला स्टॅन्ड परिसरातून हटकले होते. पण त्यानंतर ती स्टेशन रोडवर आली व तिने आपली जीवनयात्रा एस.टी. बसखाली झोकून देऊन संपवलीच.

आत्महत्येचे व्हिडीओ चित्रण व्हायरल

संबंधीत महिला बसखाली आत्महत्या करत असल्याचे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली.

फोटो नं. ०८०३२०२१-कोल- रोड ॲक्सेडेंट

ओळ : एस.टी. बसखाली आत्महत्या करण्यापूर्वी स्टेशन रोडवर संबंधीत महिला चिंताग्रस्त रस्त्याच्यामध्ये आयलॅन्डवर बसली होती.