शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

पुरी न झालेली ‘विच्छा’

By admin | Updated: November 28, 2015 00:20 IST

राज्य नाट्य स्पर्धा

पुरी न झालेली ‘विच्छा’अनेक वर्षे नाट्य स्पर्धा आणि थिएटरच्या आवारातील नाट्यविषयक घडामोडींत वावरणारी घोरपडे बंधूंची ‘सुगुण नाट्य कला संस्था’ यापूर्वी वेळोवेळी यश संपादन करून परिचित झालेली आहे. यंदाच्या स्पर्धेत स्क्रीप्ट वाचताच जाता-जाता करता येईल, असे वाटणारे वसंत सबनीस लिखित ‘विच्छा माझी पुरी करा’ हे वगनाट्य सादर केले. वगनाट्य हे जाता-जाता करण्याची गोष्ट नाही; हे जाता-जाता सिद्ध केले. आदमासे तीन-सव्वा तीन तास चाललेला हा खेळ सादरकर्त्यांच्या पायाखाली घोंगडे अडकले असल्यासारखा मुकाटपणे पाहावा लागला. खरं तर या वगनाट्याचे केवळ वाचन केले अगर वाचून दाखविले तरीही उत्साह संचारतो. रंगभूमी, नाटक आणि नाट्यतंत्रात माहीर असणाऱ्यांनी त्याचा प्रयोग सादर केल्यावर तर आणखी बहार यायला हवी होती; पण का कुणास ठाऊक हा प्रयोग याला पारखा झाला होता. साठच्या दशकात रंगभूमीवर आलेले हे वगनाट्य वसंत सबनीसांच्या सिद्धहस्त लेखणीचा पुरावाच म्हणायचा. गण, गौळण, बतावणी आणि वग या क्रमाने वगनाट्याची घडण होत असते. त्यातला गावरानपणा सादरीकरणाचे संकेत धाब्यावर बसवून त्याचं भदं होतं. संहिता फ्लेक्झिबल आहे म्हणून त्याचा अतिरेक चालत नाही. या प्रयोगात लेखकाची वाक्ये अजूनही हशा, टाळ्या मिळवितात, याला कारण लेखकाला असलेली सामाजिक, आर्थिक आणि राजकीय जाण; पण या प्रयोगात केवळ हशा मिळविणे आणि संबंधितांना खूश करण्यासाठी त्यांचे नामोल्लेख करण्याच्या हव्यासापोटी मूळ संहितेपासून हे वगनाट्य भरकटत गेले. लोकसंगीत आणि नृत्य ही वगनाट्याची अतिशय महत्त्वाची बाजू. शाहिरी म्हणजे सुगम संगीत नव्हे आणि फिल्मी रेकॉर्ड डान्स म्हणजे दिग्दर्शकाने मर्यादेच्या पलीकडे घेतलेले स्वातंत्र्यच होते. ‘राजा’, ‘हवालदार’ आणि ‘मैना’ या पात्रांनी हे नाटक वगनाट्याच्या मर्यादेत सुसह्य करायचा प्रयत्न केला. तांत्रिक बाजू ठीकठाक. सुगुण संस्थेला यापूर्वी मिळालेल्या यशाकडे पाहता, त्यांनीच का हा प्रयोग केला, असा अनुत्तरित प्रश्न रेंगाळत राहतो. होतं असं कधी-कधी!राज्य नाट्य स्पर्धा