शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याकडे माय-बाप सरकार लक्ष देणार का?

By admin | Updated: November 28, 2014 23:46 IST

अरळगुंडीकरांची व्यथा : तीन वर्षांपासून दुर्दशा

रवींद्र येसादे - उत्तूर --गेली तीन वर्षे रस्त्याच्या दुर्दशेत अडकलेल्या चिमणे-अरळगुंडी (ता. भुदरगड) रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. माय-बाप सरकार या रस्त्याकडे लक्ष देईल का? अशी विचारणा अरळगुंडी ग्रामस्थ करीत आहेत.अरळगुंडी-बेडीव-सावतवाडी ही भुदरगड तालुक्यातील गावे आजरा तालुक्यातून या गावांना प्रवेश करावा लागतो. गेली तीन वर्षे रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या मदतीतून रस्त्यावर मुरूम जे.सी.बी. टॅक्टरच्या साह्याने टाकला जातो. पूर्वी केलेला डांबरी रस्ता नामशेष झाला आहे.मुरूमाच्या साह्याने रस्त्याची डागडुजी करण्यात येत आहे. पण पावसाळ्यात रस्त्यात चिखलाचे साम्राज्य पसरते. त्यामुळे प्रवास करणे वाहनधारकांना जिकिरीचे बनले आहे.अरळगुंडी-बेडीव-सावतवाडी या गावांना बाजारहाटसाठी उत्तूर (ता. आजरा) या बाजारपेठेत यावे लागते. त्यामुळे त्यांचा नित्याचा संबंध येतो. या रस्त्यास सार्वजनिक बांधकाम विभागाचे मैल कामगार नसल्यामुळे रस्त्याची देखभाल ग्रामस्थांनाच करावी लागत आहे. चिकोत्रा प्रकल्पामुळे परिसरात उसाचे प्रमाण अधिक आहे. रस्ता चांगला नसल्याने ट्रकचालक ट्रकाची वाहतूक करीत नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायत व शेतकरी यांनाच चिमणेपासून बेडीवपर्यंत १५ कि. मी. रस्ता करावा लागतो. त्यामुळे माय-बाप सरकारने या रस्त्याकडे विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.रस्त्याची दुर्दशा उडाल्याने या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी तालुक्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांचे लक्ष या ग्रामीण भागातील गावाकडे असावे. वाहतुकीसाठी आणखी किती आर्थिक बोजा ग्रामस्थांनी सोसावयाचा असा प्रश्नही ग्रामस्थांना खुणावतो. त्यामुळे आमदार आबिटकर यांनी या लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.