शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

राजीनामा देणार नाही : महापौर

By admin | Updated: February 24, 2015 00:45 IST

राष्ट्रवादीची ‘डेडलाईन’ शुक्रवारी संपणार

कोल्हापूर : ‘माझ्यावर अन्याय झाला आहे. राजीनाम्याबाबत यापूर्वीच भूमिका स्पष्ट केली आहे. राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही’, अशा शब्दांत महापौर तृप्ती माळवी यांनी राजीनाम्याच्या चर्चेला सोमवारी पूर्णविराम दिला. राष्ट्रवादी पक्षाने शुक्रवार (दि. २७)पर्यंत महापौरांनी राजीनामा न दिल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर महापौरांनी भूमिका स्पष्ट केली. आमदार हसन मुश्रीफ यांनी महापौरांना राजीनामा देण्याबाबत आठ दिवसांची मुदत दिली आहे. यासाठी रविवारी (दि. २२) राष्ट्रवादी नगरसेविकांचे शिष्टमंडळही त्यांना भेटले. मात्र, महापौर राजीनामा न देण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. महापौर माळवी राजीनामा न देण्यावर ठाम राहिल्यास शुक्रवारी त्यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी केली जाणार आहे. या कारवाईचा काहीही परिणाम महापौर पदावर होणार नसल्याने नेत्यांचीच गोची होणार आहे. शिवसेना-भाजपची आंदोलने व सभागृहात सत्ताधाऱ्यांचा विरोध सहन करीत महापौर कशा प्रकारे कारभार करणार याबाबत मनपा वर्तुळात उत्सुकता आहे. लवकरच बजेटसाठी मनपाची सभा बोलविण्यात येणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. महापौरांनी महासभा बोलाविल्यास त्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी घेतला आहे. सभा न झाल्यास प्रशासनासमोरील अडचणी वाढणार आहेत, तर येत्या आठ-नऊ महिन्यांत महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. शिल्लक व वाढीव निधी मंजूर करून प्रभागातील कामे मार्गी लावण्याकडे नगरसेवकांचा कल आहे. त्यामुळे महासभेवर बहिष्कार टाकल्यास निधी निर्गत होणे जिकिरीचे होईल.(प्रतिनिधी)बुधवारी महासभामहापालिकेची बुधवारी (दि. २५) नगरविकास विभागाच्या सूचनेनुसार सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण-२०११वर चर्चा करण्यासाठी महासभा बोलाविण्यात आली आहे.यामध्ये प्रारूप याद्या प्रसिद्ध करून दावे व आक्षेप निकाली काढण्यासाठी प्रक्रिया व त्याचा कालावधी याबाबत जनतेला माहिती होण्यासाठी सभेत चर्चा केली जाणार आहे. राज्य शासनाने बोलावलेली सभा घेणे अपरिहार्य आहे. त्यामुळे या सभेवर नगरसेवकांना बहिष्कार टाकता येणार नाही. त्यामुळे नाइलाजाने कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना सभेला उपस्थित राहावे लागेल.