जयंत पाटील भाजपमध्ये येणार?; प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 15:52 IST2025-02-17T15:52:17+5:302025-02-17T15:52:52+5:30

सुरेश धस एखादा विषय हातात घेतला तर ते धसास लावतात

Will Jayant Patil join BJP; State President Chandrashekhar Bawankule clearly stated | जयंत पाटील भाजपमध्ये येणार?; प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले..

जयंत पाटील भाजपमध्ये येणार?; प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले..

कोल्हापूर : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जयंत पाटील प्रदेश अध्यक्ष आहेत. ते भाजपमध्ये येणार अशी अफवा पसरवून त्यांना बदनाम केले जात आहे. ते पक्षात येणार नाहीत. त्यांच्याशी आमचा कोणताही संपर्क नाही, असे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केले.

बावनकुळे म्हणाले, सुरेश धस हे धनंजय मुंडे यांना आजारी असल्याने भेटले. त्यांचा कोणताही दुसरा हेतू नाही. धस हे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. एखादा विषय हातात घेतला तर ते धसास लावतात. धस आणि मुंडे या दोघांनीही सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी भूमिका घेतली आहे. महायुतीचे सर्व पालकमंत्री कामाला लागले आहेत. दोन पालकमंत्री निवडीचा विषय अंतिम टप्प्यात आहे.

लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. या योजनेतून आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या महिलांनी स्वत:हून बाजूला व्हावे, असे आवाहन केले आहे. योजनेतून बाहेर जाणाऱ्यांवर कोणावरही कारवाई होणार नाही.

Web Title: Will Jayant Patil join BJP; State President Chandrashekhar Bawankule clearly stated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.