Kolhapur: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर विळ्याने वार, पतीविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 11:58 IST2023-10-12T11:57:41+5:302023-10-12T11:58:15+5:30

गडहिंग्लज : चारित्र्याच्या संशयावरून विळ्याने वार करून पत्नीला गंभीर जखमी केलेल्या पतीविरुद्ध गडहिंग्लज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. दत्तात्रय ...

Wife stabbed with sickle over suspicion of character, crime against husband | Kolhapur: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर विळ्याने वार, पतीविरुद्ध गुन्हा

Kolhapur: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर विळ्याने वार, पतीविरुद्ध गुन्हा

गडहिंग्लज : चारित्र्याच्या संशयावरून विळ्याने वार करून पत्नीला गंभीर जखमी केलेल्या पतीविरुद्ध गडहिंग्लज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. दत्तात्रय ऊर्फ बबन नारायण शिंदे (वय ३०, मूळ गाव कुद्रेमणी, ता. हुक्केरी, सध्या रा. भडगाव, ता. गडहिंग्लज) असे त्याचे नाव आहे.

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, मूळचे कुद्रेमणी येथील दत्तात्रय हे पत्नी श्रुतीसह (वय २४) भडगाव येथे राहतात. श्रुती या खासगी नोकरी करतात. मंगळवारी (दि.१०) दुपारी घरातील साफसफाई करून श्रुती या बाहेरच्या सोप्यात झोपल्या होत्या. दरम्यान, दत्तात्रय याने घरातील विळा त्यांच्या मानेवर ठेवून वार करीत असताना त्यांना अचानक जाग आली.

पतीला बाजूला ढकलून देऊन जिवाच्या भीतीने त्या घराबाहेर पळून जात होत्या. त्यावेळी दत्तात्रय याने त्यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूवर विळ्याने वार केले. दरम्यान, त्याने पुन्हा वार करताच तिने बचावाकरिता उजवा हात वर केला असता वार वर्मी लागून तिच्या उजव्या हाताची नस कापली आहे. श्रुती यांच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक रोहित दिवसे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Wife stabbed with sickle over suspicion of character, crime against husband