शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

Kolhapur- Vidhan Sabha Election 2024: मुश्रीफ यांचीच पुन्हा वारी की समरजित यांची वाजणार तुतारी..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 16:43 IST

मंडलिक, संजय घाटगे यांचे कार्यकर्तेच ठरविणार निकाल

ए. जे. शेखकागल : राज्यात सर्वप्रथम दोन्ही उमेदवारांची घोषणा झालेल्या कागल-गडहिंग्लज-उत्तुर विधानसभा मतदारसंघात सध्या माजी खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी नवा ट्विस्ट आणण्याचा प्रयत्न केला असला तरी पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांच्यामध्येच सरळ लढत होणार हे निश्चित आहे. कागलमध्ये पक्षापेक्षा गटातटाच्या राजकारणाला खूप महत्त्व दिले जाते. त्यामुळे संजय घाटगे व संजय मंडलिक यांनी जरी मुश्रीफ यांना समर्थन दिले असले तरी कार्यकर्त्यांना ही भूमिका कितपत रुचते, यावरच निकाल आहे.महायुतीकडून राष्ट्रवादीला ही जागा मिळणार असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन महिन्यांपूर्वीच हसन मुश्रीफ यांची उमेदवारी जाहीर केली, तर भाजपाला ही जागा मिळणार नाही हे लक्षात आल्यावर समरजित घाटगे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. घड्याळ विरुद्ध तुतारी अशी ही लढाई रंगणार आहे.

मंडलिक गट संभ्रमावस्थेतवीरेंद्र मंडलिक यांनी लोकसभेतील पराभवाला मंत्री मुश्रीफ आणि समरजित घाटगे हे दोघेही जबाबदार असल्याचे विधान करून लक्ष वेधून घेतले. मात्र, दोनच दिवसांत संजय मंडलिक हे मुश्रीफ यांच्यासमवेत विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले. यामुळे या गटात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

संजय घाटगेंचे मुश्रीफांना बळमाजी आमदार संजय घाटगे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मुश्रीफ यांना जाहीर पाठिंबा दिला तेव्हा अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती; पण जिल्हा बँकेचे संचालक पद देऊन या गटात उत्साह निर्माण करण्यात मंत्री मुश्रीफ यशस्वी झाले आहेत.

स्वाती कोरी यांची भूमिका अस्पष्टमंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये सहानुभूती निर्माण करण्याचे प्रयत्न समरजित घाटगे करीत आहेत. गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी यांची भूमिकाही अद्याप स्पष्ट झालेली नाही. काही प्रमुख कार्यकर्तेही अशाच अवस्थेत आहेत.

लढतीकडे राज्याचे लक्षकागलमधील मुश्रीफ-घाटगे लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मंत्री मुश्रीफ हे गेली वीस वर्षे मंत्रिमंडळात आहेत, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे एक बडे नेते आहेत, तर समरजित घाटगे हे राजर्षी शाहूंच्या जनक घराण्याचे वंशज, तसेच शाहू समूहाचे अध्यक्ष आहेत.

२०१९ चा निकाल

  • हसन मुश्रीफ : १,१६,४३४
  • समरजित घाटगे : ८८,३०२
  • संजय घाटगे : ५५,६५७

सध्याचे एकूण मतदान :३,३९,८२० महिला : १७०,०२७ पुरुष : १६९,७८८ इतर : ५

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kagal-acकागलHasan Mushrifहसन मुश्रीफSamarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगेNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुती