शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

हत्याकटाची टीप मिळालेला कोल्हापूरचा ‘तो’ पोलिस कोण?

By admin | Updated: June 3, 2016 01:46 IST

दाभोलकर हत्या : दोन महिने आधीच लागला होता सुगावा

चंद्रकांत कित्तुरे ल्ल कोल्हापूरअंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याकटाचा सुगावा त्यांच्या हत्येपूर्वी एक-दोन महिने आधी कोल्हापुरातील एका पोलिसाला लागला होता. तशी टीप त्याला खबऱ्याकडून मिळाली होती, असा दावा आम आदमी पक्षाचे नेते आशिष खेतान यांनी एका टिष्ट्वटद्वारे केला आहे. यामुळे कोल्हापुरातील ‘तो’ पोलिस कोण? त्याला मिळालेल्या माहितीचा सखोल पाठपुरावा झाला की नाही, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या २० आॅगस्ट २०१३ रोजी पुण्यात झाली. त्यांची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांचा शोध अद्याप लागलेला नाही. याप्रकरणी सनातन संस्थेवर सुरुवातीपासून संशय व्यक्त केला जात आहे. दाभोलकर यांच्या हत्येनंतर ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांची कोल्हापुरात, तर ज्येष्ठ कन्नड साहित्यिक आणि विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची धारवाड येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या तिघांच्याही हत्येमागे सनातन ही संस्था असल्याचा आरोप केला जात आहे. त्या दृष्टीने तपास संस्थांनी आपला तपासही सुरू ठेवला आहे. पानसरे हत्येप्रकरणी सनातनचा साधक समीर गायकवाड याला अटक करण्यात आली आहे. तपास संस्थांच्या हाती या तीनही हत्येमागे समान धागेदोरे असल्याचा पुरावा अद्याप मिळालेला नाही. दरम्यान, डॉ. दाभोलकर हत्याकटाचा छडा लागून मारेकऱ्यांची ओळख तपास संस्थांना पटल्याचा दावा आशिष खेतान यांनी बुधवारी एका टिष्ट्वटद्वारे केला होता. सीबीआयनेही बुधवारी सनातन संस्थेचा साधक सारंग अकोलकर यांच्या पुण्यातील घरावर तसेच पनवेल येथील सनातनच्या आश्रमावर छापा टाकला. यामुळे खेतान यांच्या दाव्याला पुष्टी मिळाली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, सीबीआयने याप्रकरणी अधिकृतपणे या दाव्याला दुजोरा दिलेला नाही. दाभोलकर यांची हत्या होणार असल्याची टीप कोल्हापुरातील एका पोलिसाला त्यांच्या हत्येपूर्वी एक-दोन महिने आधीच मिळाली होती. त्याने आपल्या वरिष्ठांना याची कल्पनाही दिली. मात्र, वरिष्ठांसमोर त्याला याबाबतचा अधिक तपशील देता आला नाही, असे चौकशीत दिसून आले होते, असा दावाही खेतान यांनी यासंदर्भात केलेल्या पुढील टिष्ट्वटमध्ये केला आहे. त्यामुळे हत्येपूर्वीच एक-दोन महिने आधी टीप मिळालेला ‘तो’ पोलिस कोण? याची चर्चा आता पोलिस वर्तुळात सुरू झाली आहे.