शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur-Gokul election: वेगवेगळ्या नेत्यांना एकत्र करताना महायुतीच्या प्रमुखांचा लागणार कस

By विश्वास पाटील | Updated: March 3, 2026 16:26 IST

संघातील सत्तारूढ आघाडीचे नेते म्हणून मंत्री हसन मुश्रीफ यांनाच ही मोट बांधावी लागणार आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये सर्व जबाबदारी सतेज पाटील यांच्या खांद्यावरच असणार

विश्वास पाटीलकोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत महायुतीचे पॅनेल आकार घेताना त्यामध्ये काही अंतर्गत विरोधांना सामोरे जावे लागणार आहे. या विरोधातून नेते कसा मार्ग काढतात यावरच पॅनेलची रचना कशी होणार आणि लढत कशी होणार हे ठरणार आहे. कारण, ज्यांच्यामध्ये हा परस्पर विरोध आहे ते संघाच्या राजकारणातील मातब्बर आहेत. त्यातील एखादाही नेता इकडे-तिकडे सरकला तर त्याचा लढतीवर परिणाम होणार आहे. संघातील सत्तारूढ आघाडीचे नेते म्हणून मंत्री हसन मुश्रीफ यांनाच ही मोट बांधावी लागणार आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये सर्व जबाबदारी सतेज पाटील यांच्या खांद्यावरच असणार आहे.१. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मंत्री मुश्रीफ व माजी खासदार संजय मंडलिक यांच्यात संघर्ष झाला. मंडलिक यांचे चिरंजीव विरेंद्र मंडलिक यांचा गेल्या निवडणुकीत पराभव झाल्यापासूनच मंडलिक-मुश्रीफ यांच्यात अविश्वासाचे वातावरण तयार झाले आहे. ते निवळले नाही, परंतु जिल्हा परिषदेत जास्त ढवळले. त्यामुळे शिंदेसेनेला सोबत घेताना मंडलिक काय भूमिका घेतात, याला महत्त्व आहे. त्याचे पडसाद पालकमंत्री प्रकाश आबिटकर व माजी आमदार राजेश पाटील यांच्या निर्णयावरही पडणार आहेत.२. गोकुळच्या राजकारणातील एकेकाळी माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे अत्यंत विश्वासू सहकारी व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांचे गेल्या निवडणुकीपासून महाडिक यांच्याशी आलेले वितुष्ट हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. पाटील सध्या पक्षीयदृष्ट्या शिंदेसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांच्यासोबत आहेत, परंतु गोकुळमध्ये ते काय करणार, याचे पत्ते त्यांनी ओपन केलेले नाहीत.विश्वास पाटील हे आमदार सतेज पाटील यांच्यासोबत गेल्याचा महाडिक यांना प्रचंड राग आहे. तो राग त्यांनी परवाच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही काढला आहे. पाटील यांचे चिरंजीव सचिन पाटील यांच्या पराभवासाठी त्यांनी राजाराम कारखान्याची यंत्रणा ताकदीने लावली होती. नुसती यंत्रणाच लावली नाही, तर आर्थिक बळाचाही वापर केल्याचा अनुभव पाटील यांना आला आहे. त्यामुळे महाडिक आणि आबाजी यांना सोबत घेताना मुश्रीफ यांना घाम फुटणार आहे.३. तिसरे महत्त्वाचे म्हणजे ज्याच्याकडे ठराव किती त्यानुसार उमेदवार किती, हा निकष मुश्रीफ यांनी लावला आहे. महापालिका, जिल्हा परिषदेत सर्वच पक्षांनी उमेदवाराची निवडून येण्याची क्षमता व आर्थिक ताकद यावरच जास्त भर दिला. त्याच्या पक्षीय निष्ठेचा फार विचार केला नाही. तसाच विचार यावेळेलाही होऊ शकतो.भाजपचा किमान नऊ जागांचा आग्रह आहे. तडजोड करून सातवर यायचे, परंतु त्याखाली नाही, अशी त्यांची साधारण रणनीती दिसते. संचालक मंडळात त्यांचे दोन संचालक आहेत, परंतु महाडिक गट म्हणून ताकद आणि मुख्यमंत्र्यांची व्हेटो पॉवर त्यांच्यासोबत आहे. परिणामी भाजप किती जागांसाठी आग्रही राहणार हा देखील पॅनेल बांधणीतील कळीचा मुद्दा ठरणारा आहे.४. महायुतीअंतर्गत चंदगडला राजेश पाटील विरुद्ध आमदार शिवाजी पाटील, भुदरगडला पालकमंत्री आबिटकर विरुद्ध के. पी. पाटील, करवीरला आमदार चंद्रदीप नरके विरुद्ध राहुल पाटील, असे विधानसभेतील परस्परांचे विरोधक जिल्हा परिषदेला एकमेकांच्या विरोधात मैदानात ठाकले होते. त्यांची मोट बांधताना दमछाक होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Challenges for Mahayuti leaders uniting factions in Kolhapur-Gokul election.

Web Summary : Mahayuti faces internal conflicts in forming the Gokul election panel. Leaders must navigate rivalries between key figures like Mushrif, Mandlik, and Mahadik. Seat allocation for BJP and managing opposing factions within Mahayuti are crucial for success.