विरोध होईल तिथे लाइन बदलून शक्तिपीठ होणार, मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 12:24 IST2025-06-27T12:23:41+5:302025-06-27T12:24:02+5:30

'विरोधक विरोध करणारच, त्यांचे ते कामच आहे'

Wherever there is opposition the line will be changed and a Shaktipeeth will be built says Minister Hassan Mushrif | विरोध होईल तिथे लाइन बदलून शक्तिपीठ होणार, मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

विरोध होईल तिथे लाइन बदलून शक्तिपीठ होणार, मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग हा राज्य सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यामुळे तो होणारच, कोल्हापुरातून शक्तिपीठ महामार्ग कसा नेता येईल यासाठी राज्य रस्ते महामंडळाने चार पर्याय दिले आहेत. त्यावर अजून चर्चा झालेली नाही; परंतु जिथे विरोध होईल तिथे लाइन कशी बदलून घेता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली. 

शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय होणार नाही किंबहुना तो कोणावरही लादला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिली असल्याचे स्पष्टीकरण मंत्री मुश्रीफ यांनी दिले.

मुश्रीफ म्हणाले, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की, शक्तिपीठ महामार्ग झाल्यावर कोल्हापूर जिल्ह्यातील तीर्थस्थळांची भाविक संख्या दहापटीहून अधिक वाढेल. लोकांचे उत्पन्न वाढेल. बेरोजगारीही कमी होईल. म्हणून लोकांना समजावून सांगा. अयोध्या, उज्जैन असेल.. ज्या ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्रांची कामे झाली आहेत, तिथे वीसपटीने गर्दी वाढली आहे. तिथे दरडोई उत्पन्न, रोजगारांमध्येही वाढ झाली आहे. विरोधक विरोध करणारच, त्यांचे ते कामच आहे. शक्तिपीठ हा रस्ता आम्ही करणारच. परंतु तो कोणावरही लादणारही नाही.

Web Title: Wherever there is opposition the line will be changed and a Shaktipeeth will be built says Minister Hassan Mushrif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.