Kolhapur-Local Body Election: निवडणूक लढवायला माणसं कोठून आणायची: मंत्री मुश्रीफ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 15:58 IST2025-11-24T15:56:57+5:302025-11-24T15:58:02+5:30
“सत्ता फक्त उपभोगण्यासाठी नसते, तर..

Kolhapur-Local Body Election: निवडणूक लढवायला माणसं कोठून आणायची: मंत्री मुश्रीफ
हातकणंगले : हातकणंगले नगरपंचायतीच्या निवडणुका पाच पक्ष लढवत आहेत, पण कोणालाही पॅनेल पूर्ण करता आले नाही, अशी कबुली वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. हातकणंगले नगरपंचायत निवडणुकीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
“सत्ता फक्त उपभोगण्यासाठी नसते, तर जनतेच्या संबंधित समस्या सोडवण्यासाठी सत्ता वापरावी लागते. “मी तीस वर्षे आमदार आणि बावीस वर्षे मंत्री आहे. गरिबांना मोफत उपचार उपलब्ध करून देणे, बांधकाम कामगारांना संरक्षण देणे या सगळ्या योजना शासनाच्या तिजोरीतून एकही रुपया न काढता निधी गोळा करून राबवू शकतो.
यावेळी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब, नगराध्यक्षपदाचे उमेदवार दीपक कुन्नुरे, शहराध्यक्ष अमित खोत, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष यासीन मुजावर, असगर मुजावर, हातकणंगले विधानसभा अध्यक्ष संभाजी पवार उपस्थित होते.