शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

विभागीय क्रीडासंकुल पूर्ण होणार तरी कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:18 IST

कोल्हापूर : कोल्हापूरसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग , सांगली, सातारा अशा पाच जिल्ह्यांसाठी परिपूर्ण विभागीय क्रीडासंकुल असावे, याकरिता २००९ साली तत्कालीन सरकारने संभाजीनगर येथे तुरुंग विभागाकडे असलेल्या जागेपैकी १७ एकर जागा क्रीडा विभागाकडे हस्तांतरित केली. तत्काळ कामास सुरुवातही झाली. मात्र, अद्यापही हे संकुल पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाही. यासाठी २३ कोटी रुपये ...

कोल्हापूर : कोल्हापूरसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा अशा पाच जिल्ह्यांसाठी परिपूर्ण विभागीय क्रीडासंकुल असावे, याकरिता २००९ साली तत्कालीन सरकारने संभाजीनगर येथे तुरुंग विभागाकडे असलेल्या जागेपैकी १७ एकर जागा क्रीडा विभागाकडे हस्तांतरित केली. तत्काळ कामास सुरुवातही झाली. मात्र, अद्यापही हे संकुल पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाही. यासाठी २३ कोटी रुपये निधी उपलब्ध केला होता. त्यात वाढ होत-होत आता ३६ कोटी रुपये झाले तरी हे संकुल काही केल्या पूर्ण होण्याचे नाव घेईना.संभाजीनगर रेसकोर्स नाक्याजवळील कैद्यांची शेतीमधील १७ एकर जागा या संकुलासाठी देण्यात आली आहे. यात ४०० मीटर धावपट्टी, टेनिस कोर्ट, खो-खो, कबड्डी, फुटबॉल मैदान, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल, शुटिंग रेंज, जलतरण तलाव, आदींचा समावेश होता. यातील गेल्या आठ वर्षांत जलतरण तलाव व शूटिंग रेंज वगळता सर्व मैदाने सर्वांसाठी खुली केली आहेत. जलतरण तलाव आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार हवा होता; म्हणून तज्ज्ञ वास्तुविशारदाकडून त्याचा आराखडा करण्यात आला. त्यात त्रुटी राहिल्याने त्या जलतरण तलावामध्ये संकुलाच्या संरक्षक भिंतींमागून जाणाºया छोट्या ओढ्याचे पाणी मुरू लागले. ही बाब संपूर्ण तलाव बांधून झाल्यानंतर लक्षात आली. त्यामुळे यावर काय करायचे याचा खल करण्यातच तीन वर्षे गेली. प्रत्येक वेळी क्रीडाप्रेमींनी विभागीय आयुक्तांकडे दाद मागायची. ते म्हणायचे, लवकरच काम पूर्ण करून ते सर्वांसाठी खुले करू. या आश्वासनाशिवाय क्रीडाप्रेमींना काहीच मिळत नाही. २५ बाय ५० मीटरच्या या तलावासाठी पुन्हा आराखडा समितीची नेमणूक केली आहे. अजूनही या समितीचा अहवाल संकुल समितीला प्राप्त झालेला नाही. मुळातच या ठिकाणी तलावासाठी योग्य जागा नाही, हे तज्ज्ञांना का समजले नाही? त्यामुळे यावरील कोट्यवधीचा खर्च फुकट गेला असून त्यासाठी कोणाला जबाबदार धरायचे की जनतेचा पैसा असाच कोणीतरी लाटून नेणार आहे, ही भावना कोल्हापूरकरांच्या मनात निर्माण होत आहे२०१४ पासून क्रीडा उपसंचालक कार्यालयास पूर्ण वेळ उपसंचालक लाभलेला नाही. अनेकवेळा प्रभारी म्हणून नेमणूक केली. विशेष म्हणजे या संकुलाबाबतचे सर्व निर्णय घेण्याचा अधिकार विभागीय क्रीडा उपसंचालकांना आहे. त्यामुळे ते बसणार अन्यत्र; तेथून हा सर्व कारभार ते हाकतात. त्यामुळे या संकुलाचे काम काही केल्या पूर्ण होईनासे झाले आहे.आदेशानंतरही काम संथगेल्या चार वर्षांपासून जलतरण तलाव, शूटिंग रेंज याबाबत विभागीय आयुक्तांच्या अखत्यारित २० हून अधिक आढावा बैठका झाल्या आहेत; तर हे काम पूर्ण होता-होता दोन विभागीय आयुक्तांची बदली झाली; तर नव्याने त्या ठिकाणी चंद्रकांत दळवी यांनी पदभार घेतला. गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांनीही काम लवकर करण्याचे आदेश देत नाराजीही व्यक्त केली; पण अजूनही हे काम काही केल्या पूर्ण होईनासे झाले आहे.महिला व पुरुषस्वच्छतागृहांची वानवाइतके कोटी रुपये खर्चून क्रीडासंकुलाची उभारणी केली; पण त्यात खेळाडूंना लागणाºया प्राथमिक सुविधांचा विचारच केलेला नाही. पुरुष व महिलांकरिता स्वच्छतागृह व चेंजिंंग रूम नाहीत. यासह जलतरण तलावासाठी लागणाºया फिल्टरेशन प्लँटची सोय अद्यापही केलेली नाही.शूटिंग रेंज पूर्ण; पण खुली नाहीगेल्या काही वर्षांमध्ये शूटिंग रेंज पूर्ण व्हावी म्हणून नेमबाजांसह क्रीडाप्रेमी ओरड करीत होते. त्यानुसार १० मीटर, २५ मीटर व ५० मीटरच्या अंतर्बाह्य अशा दोन रेंज तयार झाल्या आहेत; पण त्या संकुल समितीकडे अद्यापही हस्तांतरित झालेल्या नाहीत, अशी ओरड समितीकडून होत आहे. विशेष म्हणजे यातील लागणारे शस्त्रसाहित्य खरेदीची निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे क्रीडा विभागाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे ही रेंज अजूनही काही दिवस नेमबाजांना उपलब्ध होईल की नाही हे सांगता येत नाही.कामाचा दर्जा कोण तपासणार?यापूर्वी झालेल्या कामाचा दर्जा त्रयस्थांमार्फत तपासण्यात यावा, अशी क्रीडाप्रेमींकडून मागणी होत आहे. काही कामांचे आताच तीनतेरा वाजले आहेत. फरशा उखडणे, आदी कामे नव्याने केली पाहिजेत. त्यातून दर्जात्मक काम किती झाले हे समजेल. तसेच जलतरण तलावाचा आराखडा करतेवेळी या सर्व बाबींचा विचार न करता काम करून ते पूर्ण होईपर्यंत तलावात अशुद्ध पाणी मुरते, ही बाब तज्ज्ञांच्या लक्षात कशी आली नाही? झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीस कोण जबाबदार? असाही सवाल क्रीडाप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे. दोषींवर कारवाई करून नुकसानीचा खर्च वसूल करण्याचीही मागणी होत आहे.

टॅग्स :Sportsक्रीडाkolhapurकोल्हापूर