शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांना मुख्यमंत्र्यांवर टीकेचा अधिकार काय ?

By admin | Updated: July 30, 2014 00:29 IST

दिलीप पाटील : टोलबाबत महायुतीचे नेते दुटप्पी

कोल्हापूर : कॉँग्रेस आघाडी सरकारने गेल्या पाच वर्षांत अनेक विकासाची कामे केली आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून गोरगरिबांना आधार देण्याचे काम मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले असताना विरोधकांकडून त्यांना बदनाम करण्याचे षड््यंत्र सुरू आहे. कर्तृत्वशून्य विरोधकांना मुख्यमंत्र्यांवर टीकेचा अधिकार काय? असा सवाल कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ)चे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकातून केला. टोलला जन्म देणारे महायुतीचे नेतेच टोल हद्दपार करण्याची भाषा करत आहेत, ही दुटप्पी भूमिका जनतेने ओळखल्याची टीकाही त्यांनी केली. मुख्यमंत्री चव्हाण यांनी भ्रष्टाचारमुक्त प्रशासन कसे करता येईल, हे कृतीने दाखवून दिले आहे. त्यांनी प्रशासनाला एक शिस्त लावली आहे. दुष्काळ निवारण, जलसंधारण, मराठा समाजाला आरक्षण, आदी भरीव कामे त्यांनी केली. विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी कॉँग्रेसने एन्रॉन प्रकल्प आणला; पण विरोधकांनी त्यात खोडा टाकला आणि पुन्हा सुरू केला. आता जैतापूरचा अणू ऊर्जा प्रकल्प मार्गी लावून राज्य विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्यालाही विरोध करून बंद पाडण्याचा प्रयत्न शिवसेना-भाजपची मंडळी करत आहेत. सत्तेच्या हव्यासापोटी बहुजन समाजासाठी काम करणाऱ्या नेत्यांवर आरोप करण्याचे काम ही मंडळी करत आहे; पण पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र अशा प्रवृत्तींना थारा देणार नाही, असा विश्वासही पाटील यांनी पत्रकातून व्यक्त केला आहे.  टोल आकारणीचे काम देशात सर्वप्रथम चंद्राबाबू नायडू यांनी केले. ते सध्या केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये आहेत. मुंबई-बंगलोर महामार्ग, मुंबईतील प्लायओव्हरवर प्रथम शिवसेना व भाजपनेच टोल लावला. ही टोल जन्माला घालणारी मंडळीच तो रद्द झाला पाहिजे, अशी वल्गना करत आहेत. ही दुटप्पीची टीकाही पाटील यांनी केली.