शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
3
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
4
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
5
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
6
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
7
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
8
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
9
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
10
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
11
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
12
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
13
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
14
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
15
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
16
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
17
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
18
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
19
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
20
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
Daily Top 2Weekly Top 5

नागपंचमीसाठी कायद्यात बदल करू

By admin | Updated: July 6, 2015 00:31 IST

प्रकाश जावडेकर : आश्वासनानंतर शिराळा बंद मागे

शिराळा : शिराळ्याच्या नागपंचमीसाठी हिवाळी अधिवेशनात कायद्यात बदल करून पुढील वर्षाची नागपंचमी शिराळकरांना पारंपरिक पद्धतीने साजरी करता येईल, असे ठोस आश्वासन केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी शिराळ्यातील शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळाने पुणे येथे जावडेकर यांची भेट घेतली. आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक, सत्यजित देशमुख, सदाभाऊ खोत, विलास देशमुख, अ‍ॅड. भगतसिंग नाईक, सरपंच गजानन सोनटक्के यांच्यातर्फे त्यांना निवेदन देण्यात आले. जावडेकर यांच्या आश्वासनानंतर व तालुक्यातील नेत्यांच्या आवाहनानंतर रविवारी दुपारनंतर शिराळा बंद मागे घेण्यात आला. आजपासून व्यवहार पूर्ववत सुरू होणार आहेत. यावेळी जावडेकर म्हणाले की, शिराळ्यातील नागपंचमी उत्सवाला हजारो वर्षांची परंपरा आहे. परंतु यापूर्वी चुकीचा कायदा झाल्यामुळे नागपंचमी पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यास अडचणी येत आहेत. आता कायद्यात बदल करणार असून, त्यासाठी सुब्रह्मण्यम कमिटी स्थापन केली आहे. या कमिटीद्वारे कायद्यात दुरुस्ती करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. अधिवेशनात त्यास मंजुरी मिळेल. या कायद्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहू नयेत, याची काळजी घेतली जाईल. नागपंचमीची बाब न्यायप्रविष्ट असल्यामुळे या वर्षाची नागपंचमी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणेच साजरी करावी, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)चौथ्या दिवशीही बंदनागपंचमीच्या प्रश्नावर रविवारी चौथ्या दिवशी कडकडीत बंद पाळण्यात आला, तर चक्री उपोषणात मुस्लिम संघटनेसह नागरिक सहभागी झाले होते. दि. २९ रोजी राजेंद्र माने यांनी बेमुदत उपोषणास सुरुवात केली होती. त्यांनी उपोषण सोडल्यावर तीन दिवसांपासून चक्री उपोषण चालू आहे. रविवारी मुस्लिम वेलफेअर संघटेनेचे अध्यक्ष डी. जी. आत्तार, के. आर. पठाण, फारूख शेख, हिदायत मुल्ला, शफी मुल्ला, खलील मोमीन, सिकंदर पठाण, जावेद नदाफ, फिरोज मुजावर, हारुण शेख, महंमद पठाण, जावेद काझी, दिलावर मोमीन, नौशाद सय्यद, मुबारक मुल्ला, ग्रामपंचायत सदस्य महादेव कुरणे यांनी उपोषणात सहभाग घेतला होता.आपणही उपस्थित राहू !पुढील वर्षाची नागपंचमी ही नवीन कायद्याच्या बदलानुसार होणार आहे. त्यामुळे आपण स्वत: नागपंचमी उत्सवास हजर राहू, असे आश्वासनही प्रकाश जावडेकर यांनी दिले.