आम्ही बावड्यापुरतं बंटी पाटलांचं ऐकायचं ठरवलंय; मंत्री मुश्रीफ यांचा टोला आणि सतेज यांनी दिले प्रत्युत्तर -video

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 13:40 IST2025-06-27T13:36:51+5:302025-06-27T13:40:40+5:30

मुश्रीफ आणि पाटील यांच्यात टोलेबाजी रंगली

We have decided to listen to Bunty Patil for the sake of Bawda Minister Hasan Mushrif's attack and Satej Patil reply | आम्ही बावड्यापुरतं बंटी पाटलांचं ऐकायचं ठरवलंय; मंत्री मुश्रीफ यांचा टोला आणि सतेज यांनी दिले प्रत्युत्तर -video

आम्ही बावड्यापुरतं बंटी पाटलांचं ऐकायचं ठरवलंय; मंत्री मुश्रीफ यांचा टोला आणि सतेज यांनी दिले प्रत्युत्तर -video

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या अध्यक्ष निवडीनंतर शाहू महाराजांना अभिवादन करण्याच्या निमित्ताने पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील पहिल्यांदाच एकत्र आले. त्यामुळे या सर्वांच्या बोलण्याकडे कार्यकर्त्यांचे बारीक लक्ष होते.

शाहू महाराजांना अभिवादन झाल्यानंतर सर्वजण बाहेर पडताना नेहमीच्या पद्धतीने सतेज पाटील यांच्या मागून जाताना मुश्रीफ म्हणाले, आम्ही बावड्यापुरतं बंटी पाटलांचं ऐकायचं ठरवलंय. दुसऱ्यांदा त्यांनी हे वाक्य बोलून दाखवलं. त्यावर सतेज पाटील यांनीही ‘शाहू महाराजांचा जन्म आमच्या गावात झालाय हे लक्षात ठेवा’ असे मुश्रीफ यांना सांगितले. हे सगळे ऐकण्यासाठी खासदार शाहू छत्रपती हे पाठीमागेच होते.

जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा बदलणाऱ्या ‘गोकुळ’च्या अध्यक्ष निवडीनंतर हे सर्व नेतेमंडळी पहिल्यांदा एकत्र आल्याने साहजिकच माध्यम प्रतिनिधीही मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या देखत मुश्रीफ आणि पाटील यांच्यात ही टोलेबाजी रंगली. दिवसभर ती सोशल मीडियावरही जोरदार चर्चेत राहिली.

Web Title: We have decided to listen to Bunty Patil for the sake of Bawda Minister Hasan Mushrif's attack and Satej Patil reply