शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: विश्वास पाटलांच्या उलटं काम करायला लागतंय; महादेवराव महाडिक यांची ऑडिओ क्लिप व्हायरल, ‘गोकुळ’च्या राजकारणातील उट्टे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 11:53 IST

महाडिक यांनी लावलेल्या जोडण्यांची वात ‘गोकुळ’च्या आगामी निवडणुकीपर्यंत धुमसत राहणार

कोल्हापूर : ‘विश्वास पाटलांच्या उलटं काम तुम्हाला करायला लागतंय’ अशी सूचना करणारी माजी आमदार महादेवराव महाडिक यांची ऑडिओ क्लिप मंगळवारी दिवसभर जोरदार व्हायरल झाली. या मतदारसंघातील राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार कसबा बीडचे राजू सूर्यवंशी यांच्या कार्यकर्त्यांनीही ‘हर हर महादेव...’ अशी टॅगलाइन देऊन ही क्लिप स्टेट्सला लावली होती. महाडिक यांनी वाशी (ता. करवीर) येथील एका कार्यकर्त्याला फोन लावल्याचे हे संभाषण आहे. त्यामध्ये महाडिक म्हणतात, बीडचा राजू उभा राहिला आहे आणि आपल्याला विश्वास पाटलाच्या उलटं काम करायचं आहे. राजूला मदत म्हणजे बीडच्या महादेवाला मदत केल्यासारखे आहे. त्याचे मानसिक समाधान तुम्हाला मिळणार आहे. त्याला तो कार्यकर्ताही ‘होय साहेब.. त्यानुसार काम करतो.. तुमचा ‘शब्द’ पडू देत नाही’ असे आश्वासन देतो. तुमचे कुठलीही काम असेल तर कारखान्यावर यायचं. मी सगळी मदत करतो, असेही सांगायला महाडिक विसरत नाहीत.गोकुळ दूध संघाच्या राजकारणात एकेकाळी महाडिक यांचे ‘विश्वासू सहकारी’ असलेले विश्वास पाटील गेल्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांच्या बाजूने उभे राहिले. त्यामुळे संघामध्ये सत्तांतर झाले. आमदार चंद्रदीप नरके यांच्याबद्दलही महाडिक यांचा खुपिरे येथील चर्चेचा व्हिडीओ लोकसभेच्या २०१९ च्या आधी व्हायरल झाला होता. त्याचा निकालावर परिणाम झाला. सचिन पाटील यांच्या विजयासाठी आमदार नरके यांनीही प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यामुळे महाडिक यांनी लावलेल्या जोडण्यांची वात ‘गोकुळ’च्या आगामी निवडणुकीपर्यंत धुमसत राहणार आहे.सर्व पातळ्यांवर उतरूनही..चांगला उमेदवार, व्यक्तिगत संपर्क यंत्रणा आणि सर्व पातळ्यांवर उतरूनही सचिन पाटील यांचा पराभव कशामुळे झाला, याची कारणमीमांसा नरके गट व व्यक्तिगत विश्वास पाटील यांच्याकडून सुरू झाली आहे. अगदी पाटील यांचे गाव असलेल्या माळ्याची शिरोली व आजूबाजूच्या गावांतही राजू सूर्यवंशी व काँग्रेसच्या डॉ. के. एन. पाटील यांना चांगली मते मिळाली आहेत. ही नाराजी नेत्यांपर्यंत कशी पोहोचली नाही, याबद्दल आता आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Mahadik's audio clip on opposing Patil goes viral.

Web Summary : Mahadevrao Mahadik's audio clip instructing to work against Vishwas Patil went viral. This exposed the undercurrents in Gokul milk union politics. Defeat analysis of Sachin Patil is underway.