शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

स्कूल चले हम.. ‘सुजाता दिदी’ के साथ

By admin | Updated: March 7, 2017 22:58 IST

४ वर्षांपासून साताऱ्यासारख्या शहरात सायंकाळी मी वेगवेळ्या शाळेतील लहान मुलांना घेऊन जाण्याचे व घरी सुखरुप सोडण्याचे काम

संजय कदम -- वाठार स्टेशन  --असाध्य ते साध्य होईल तयास मनाची जिद्द चिकाटी आणि परिश्रम हे गुण अंगी असतील तर जीवनात कोणतीच गोष्ट अशक्य नाही, हे साध्य करण्यासाठी अगदी पुरुषप्रधान समाजाचा पगडा असलेल्या ड्रायव्हिंग व्यवसायात ही कोणताच कमीपणा न समजता हे एक वेगळ आव्हान म्हणून स्वीकारत गेली ४ वर्षांपासून साताऱ्यातील विविध इंग्रजी माध्यमिक शाळेत चिमुकल्यांना वेळेत सुखरुप पोहोचवण्याचे काम सुजाता सोनटक्के ही धाडसी लेडी बस ड्रायव्हर मोठ्या आनंदाने करीत आहे.सुजाता ज्ञानदेव सोनटक्के यांचे माहेर वाई तालुक्यातील पांडे या गावात लहानाचे मोठे झाल्यानंतर त्यांनी ९ वी पर्यंतचे शिक्षण घेऊन शाळेला रामराम केला. यानंतर काही दिवसातच त्यांचा विवाह कामेरी येथील ज्ञानदेव सोनटक्के यांच्याशी झाला सासरची परिस्थिती हलाकीची असल्याने त्यांनी मुलाबाळांच्या सांभाळासाठी गावातच शेतमजुरी सारखी कामे केली. मात्र, मुलांना चांगल दर्जेदार शिक्षण देण्यासाठी त्यांनी सातारा गाठला. माझे पती मुंबईत पेंटिंगची छोटी-मोठी कामे करत असल्याने त्यांनीही ते काम सोडून दिले आणि साताऱ्यात आम्ही स्वत:च कपड्याला इस्त्री करण्याचा व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय माझे पती सांभाळत असल्याने मी नोकरीच्या शोधात होते. यातच माझे शिक्षण ९ वी पर्यंतच झाल्यामुळे चांगली नोकरी शोधूनही सापडत नव्हती. मात्र, लहान मुलांची मला पहिल्यापासूनच आवड असल्याने मी इंग्लिश मीडियम स्कूलमधील स्कूल बसमध्ये बस अटेंंडन्स म्हणून सुरुवातीला वेगवेगळ्या ठिकाणी दोन वर्षे काम केले. आज गेली ४ वर्षांपासून साताऱ्यासारख्या शहरात सायंकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत मी वेगवेळ्या शाळेतील लहान मुलांना घेऊन जाण्याचे व घरी सुखरुप सोडण्याचे काम करत असल्याचे समाधानी उत्तर सुजाता यांनी दिले. त्यांची दोन्ही मूल त्यांच्या कमाईतून उच्च शिक्षण घेत आहेत.स्कूल बस चालक म्हणून काम करण्यात मला जो आनंद मिळतो तो खूप समाधानी आहे. आज जरी मी छोटी स्कूल बस चालवत असली तरी भविष्यात मी मोठी बस घेऊन ती चालवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शेवटी ज्या गोष्टीत आपणास समाधान मिळते ते काम आपण करावे त्या प्रमाणे मी हे काम आनंदाने करीत आहे.- सुजाता सोनटक्के