शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही साऱ्या कमळामावशी...

By admin | Updated: February 23, 2015 23:57 IST

आठवणींचा जागर : माणूस म्हणून जगण्याचा निर्धार

सांगली : संग्राम संस्थेच्या कार्यकर्त्या असणाऱ्या ज्या कमळाबाई पानी यांनी सर्वांना माणूस म्हणून जगण्याची शिकवण दिली... अन्यायाविरोधात लढण्याचे बळ दिले.... सतत संस्थेच्या प्रगतीचा ध्यास घेतला... सर्वांशी मैत्रिपूर्ण संबंध जोडून माणुसकी जपली, त्यांचा वारसा पुढे न्यायचा असेल, तर भविष्यकाळात प्रत्येकाने कमळामावशी म्हणूनच कार्यरत राहिले पाहिजे, अशी अपेक्षा आज सोमवारी संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांनी ‘आठवणींचा जागर’मध्ये व्यक्तकेली. सांगलीसह राज्यभरातील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या प्रश्नांवर सातत्याने न्याय मिळवून देण्यासाठी शासन आणि आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पाठपुरावा करणाऱ्या कमळाबाई पानी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या आठवणी जागविण्यासाठी संग्राम, व्हॅम्प, मुस्कान, कसम, विद्रोही महिला मंच, मित्रा, नजरिया संघटनेतर्फे गोकुळनगर येथे आज सोमवारी सकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार हरिष यमगर होते. प्रारंभी कमळाबाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. वसंत भोसले म्हणाले, गोकुळनगर येथील कमळाबार्इंचे कार्य ‘रोल मॉडेल’ म्हणून ओळखले जात होते. त्यामुळेच येथील कार्याचा अभ्यास करण्यासाठी जगभरातून अनेकजण येत असत. तुम्हा सर्वांना माणूस म्हणून जगण्यास शिकविणाऱ्या कमळामावशींचे कार्य पुढेही त्याच ताकदीने सुरू ठेवणे ही त्यांना आदरांजली ठरेल.  हरिष यमगर म्हणाले, कमळामावशी नेहमी सामान्यांसाठी कार्यशील होत्या. गोकुळनगर येथील अनेक महिलांना खंबीरपणे बोलायची ताकद त्यांच्यामुळेच मिळाली. त्यांनी कधीही गैरमार्गाला थारा दिला नाही. तोच वारसा तुम्हीही पुढे चालविणे गरजेचे आहे. संग्राम संस्थेच्या मीना शेषू यांनी, कमळामावशींनी त्यांचे अनुभवाचे बोल आम्हाला सांगितल्यामुळेच आम्हाला नवे काही शिकता आले. तसेच त्यांनी सर्वांनाच माणूस म्हणून जगण्याची शिकवण दिल्याचे सांगितले. याप्रसंगी बेंगलोर येथील नॅशनल नेटवर्क आॅफ सेक्स वर्कर्सच्या मुक्ता, कर्नाटक सेक्स वर्कर्सच्या भारती, मुस्कान (पुणे) येथील काजल, नगरसेवक शेवंता वाघमारे, उत्तम कांबळे, सपना शिंदे, भीमव्वा गोल्हार, दुर्गा पुजारी, शबाना काझी, निलव्वा सिध्दरेड्डी, राजू नाईक आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)